‘वेळेवर लग्न केले पाहिजे नाहीतर…’, वधूच्या रुपातील फोटो शेअर करत ‘भोजपुरी क्वीन’ने दिले भन्नाट कॅप्शन


भोजपुरी चित्रपटांनी आणि गाण्यांनी गेल्या काही दिवसात खूप प्रसिद्धी मिळवली आहे. जवळपास प्रत्येक गाणी आणि चित्रपट मोठ्या प्रमाणात गाजत आहेत. भोजपुरी क्वीन राणी चटर्जी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती कायमच तिचे आकर्षक आणि हटके फोटो शेअर करत असते. राणी तिच्या चाहत्यांनाही तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगत असते. राणी चटर्जी आजकाल तिच्या, आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान, राणीने वधूच्या जोडप्यात आपले काही फोटो शेअर केले आहेत. तिचे एवढे सुंदर फोटो बघून चाहते, वेडे झाले आहेत. विवाहित जोडप्यात एक फोटो शेअर करताना, राणीने चाहत्यांना एक सल्लाही दिला आहे.

राणीने वधूच्या वेशात एकटीचे तर जोडप्यात तीन फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती एका फोटोमध्ये एकटी पोज देताना दिसत आहे, आणि इतर दोनमध्ये ती वरासमवेत उभी आहे. फोटोंमध्ये राणीने केशरी रंगाचा अतिशय सुंदर लेहेंगा घातला आहे, आणि सोळा श्रृंगाराने सजलेली आहे. आपल्या एकटीचा फोटो शेअर करताना तिने लिहिले, ‘४२० लग्नाचे आकडे पूर्ण झाले आहेत. तसेच माझ्या चित्रपटांचा ४२० आकडाही पूर्ण झाला.’ राणीच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

दुसर्‍या फोटोमध्ये राणी आपल्या वराबरोबर उभी आहे. फोटो शेअर करताना तिने लिहिले, ‘मोठी माणसं म्हणतात की, योग्य वेळी लग्न केल्याने चांगला वर मिळतो… माझ्या पुढच्या पोस्टची वाट पाहा.’

तिसर्‍या फोटोमध्ये तिच्यापेक्षा मोठ्या वयाच्या वराबरोबर एक फोटो शेअर करताना राणीने लिहिले, ‘तर योग्य वेळी लग्न केलले पाहिजे, नाहीतर नंतर असे मिळतात. आशा करते की, हे पाहून तूम्ही मला मारणार नाही, लॉकडाऊन आहे कसं मारणार? बाबुल की गलियां. बाबुल ये मेरे साथ क्या किया?’ या फोटोवर अनेक चाहत्यांनी, प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एकाने लिहिले, ‘जोडी मस्त आहे.’ दुसर्‍या युजरने लिहिले, ‘सुंदर.’

‘भोजपुरी क्वीन’ राणी चटर्जी ‘खतरों के खिलाडी’च्या शेवटच्या सिझनमध्ये दिसली होती. शोमध्ये राणी जबरदस्त स्टंट करताना दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पैशांसाठी केले तिने ‘कांटा लगा’ या वादग्रस्त गाण्यामध्ये काम; एकाच रात्रीत बनली स्टार

-‘करीना कपूरकडे अशी कोणती गोष्ट आहे, जी तुझ्याकडे नाही?’ राणीचे उत्तर ऐकून बसेल धक्का

-एकेकाळी सुंदर चेहरा नाही म्हणून नाकारली गेली होती इरफान खानची अभिनेत्री, आता बॉलिवूडमध्येे वाजवतेय डंका, वाढदिवशी लिहिली भावुक पोस्ट


Leave A Reply

Your email address will not be published.