Sunday, April 20, 2025
Home टेलिव्हिजन शुभ मंगल सावधान! बिग बाॅसमधील ‘हे’ स्पर्धक अडकणार लग्न बंधनात

शुभ मंगल सावधान! बिग बाॅसमधील ‘हे’ स्पर्धक अडकणार लग्न बंधनात

छाेट्या पडद्यावरील वादग्रस्त शाे ‘बिग बॉस 16‘ मध्ये बरेच भांडने पाहायला मिळत आहे. एपिसोडची सुरुवात टीना दत्ता आणि शालीन भानोत यांच्या भांडणाने होते. टीनाच्या रागामुळे शिव ठाकरे याचेही तिच्याशी वाद झाल्याचे बघायला मिळते. निमृत कौर अहलुवालिया हिने टीनाला शांत होण्यास सांगितले आणि तिची तुलना सौंदर्या शर्मा हिच्याशी केली. नंतर, टीनाच्या वागण्यामुळे निमृतला पुन्हा राग येतो. अब्दु रोजिक आणि शिव तिचे सांत्वन करतात आणि तिला समजवतात की, ती स्ट्रॉन्ग आणि योग्य आहे. त्याचवेळी अर्चना गौतम आणि सौंदर्या यांच्यात टॉयलेटबाबत मजेदार आणि विचित्र चर्चा पाहायला मिळाली.

नंतर टीना दत्ता (tina datta) आणि शालीन भानोत (shalin bhanot) यांच्यातील भांडण पाहायला मिळाली. यानंतर अर्चना गौतम सौंदर्या शर्माला शालीनची छेड काढण्यासाठी तिला चिडवते, ज्यामुळे टीनाला हेवा वाटू लागतो. त्यानंतर प्रियांका चौधरी आणि अंकिता गुप्ता यांच्यात वाद पाहायला मिळाले. अर्चना आणि प्रियांका मिळून अंकितची चेष्टा करत होत्या, त्यामुळे तो चिडतो आणि प्रियांकाला तिच्या भूतकाळातील वागणुकीची आठवण करून देतो. त्यानंतर दोघांमध्ये चांगलेच भांडण हाेतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

त्याचवेळी सुंबुल तौकीर खान (sumbul tauqeer khan) हिने वेडिंग प्लॅनचे निम्रित कौर अहलुवालिया (nimrit kaur ahluwalia) आणि साजिद खान ( sajid khan) यांच्यासमोर मोठे वक्तव्य केले. तिचा बॉयफ्रेंड फहमान खान (fahman khan) वयाच्या 40 व्या वर्षी लग्न करणार असल्याचा खुलासा तिने केला. सुंबुलने सांगितले की, तो आणि फहमन दोघेही आनंदाने लग्न करणार आहेत. दुसरीकडे, अंकित गुप्ता आणि प्रियांका चौधरी कॉजी रोमान्ससह पॅच अप करण्याचा प्रयत्न करत असल्याचे बिग बाॅसच्या घरात दिसते.(bigg boss 16 update sumbul tauqeer khan ger married fahman khan shekhar suman roasted actress tina datta)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सोनम कपूरने बिपाशाच्या मुलीसाठी पाठवले ‘हे’ सुंदर गिफ्ट, अभिनेत्रीने दाखवली झलक

अर्रर्र! असं काय घडलं की, झलकच्या मंचावर करणच्या डाेळ्यात तरळले अश्रू?

हे देखील वाचा