‘बिग बॉस मराठी’चा उपविजेता जय दुधानेच्या घरी झाले त्याचे दणक्यात स्वागत, व्हिडिओ आला समोर


‘बिग बॉस मराठी’चे तिसरे पर्व नुकतेच संपले आहे. तब्बल १०० दिवसांचा प्रवास करून या शोला तिसऱ्या पर्वाचा विजेता मिळाला आहे. विशाल निकमने त्याच्या नावी बिग बॉसची ट्रॉफी केली आहे. त्यामुळे सर्वत्र त्याचे कौतुक चालले आहे. यासोबत या शोमध्ये जय दुधाने हा उपविजता ठरला आहे. त्याचे देखील सर्वात कौतुक चालले आहे. सगळे स्पर्धक त्यांच्या घरी गेले आहेत आणि आता पुन्हा सगळे त्यांच्या कामात व्यस्त होत चालले आहेत. अशातच जयच्या घरी तो बिग बॉसमधून आल्यानंतर दणक्यात स्वागत झाले आहे.

जयने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. या फोटोमध्ये त्याच्या घरात त्याचे केक कापून स्वागत झाले आहे. त्याच्या केकवर बिग बॉसच्या ट्रॉफीचे चित्र होते. त्याच्या मागे बिग बॉसमधील त्याचे सगळे फोटो लावलेले असतात. अशाप्रकारे त्याच्या कुटुंबातील सगळ्यांनी त्याला खास सरप्राइज दिले आहेत. (Bigg Boss Marathi 3 runner up winner Jay dudhane family welcome him home)

जयच्या या पोस्टवर अनेकजण त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. जयने हिंदी रियॅलिटी ‘स्प्लिट्सविला’ हा शो केला आहे. त्यानंतर तो बिग बॉसमध्ये आला. त्यामुळे त्याला हा शो आधी पासूनच चांगल्याप्रकारे समाजाला होता. एक खेळाडू म्हणून त्याने नेहमीच घरात आणि टास्कमध्ये उत्तम कामगिरी केली. बिग बॉस घरात त्याने दोन वेळा टास्क जिंकून कॅप्टन मिळवली आहे.

बिग बॉसच्या घरात जय आणि उत्कर्ष यांची मैत्री खूप गाजली. घरात ते दोनच स्पर्धक असे होते ज्यांची शेवटपर्यंत कधीच भांडण झाली नाही. सगळीकडे त्यांना जय विरू या नावाने ओळखतात. त्या दोघांच्या जोडीचे नेहमीच खूप कौतुक झाले आहे.

हेही वाचा :

फार्महाऊसपासून प्रायव्हेट योर्टपर्यंत, सलमान खान आहे ‘या’ लक्झरी वस्तूंचा मालक, पाहा यादी

‘हातात सिगारेट, महिलेचं ओंगळवाणं प्रदर्शन…’ रुपाली चाकणकर यांनी केला ‘अनुराधा’ वेबसीरिजच्या पोस्टरवर आक्षेप व्यक्त

अनुष्का शर्माने फिटनेसवर लक्ष देण्यास केली सुरुवात, वर्कआऊट करतानाचे फोटो केले शेअर

 


Latest Post

error: Content is protected !!