‘बिग बॉस’मध्ये धमाल करायला येणार टीव्हीच्या ‘या’ दोन सूना; अभिनेत्रींची नावं आली समोर


टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वात विवादित शो म्हणून ‘बिग बॉस’चे नाव सर्वप्रथम डोक्यात येते. मारामारी, भांडण, वाद, शिवीगाळ असे सर्व कृत्य असलेला हा शो नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो. या शोचे प्रत्येक पर्व कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी गाजताना दिसते. यावर्षी या शोचे १५ वे पर्व असणार आहे.

यावर्षी बिग बॉसचा १५ वा सीझन ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीझ करण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा नुकतीच करण्यात आली. सलमान खानने बिग बॉस ओटीटीचा पहिला प्रोमो रिलीज करत ही घोषणा केलीय. बिग बॉस सीझन १५ साठी प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. येत्या ८ ऑगस्ट पासून बिग बॉस ओटीटीला सुरूवात होणार आहे. या शोमधील स्पर्धकांची नावे आता समोर येऊ लागली आहे. यात टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील दोन हिट ‘बहूंची’ एन्ट्री होणार असल्याचे समजत आहे. रिद्धिमा पंडित आणि नेहा मर्दा या दोघी या शोमध्ये दिसणार असल्याचे सांगितले जात आहे. (Bigg boss ott riddhima Pandit and Neha Marda expected to join the show)

रिद्धिमा आणि नेहा यांनी जर बिग बॉसमध्ये खरंच एन्ट्री केली, तर हा या दोघींचाही पहिलाच रियॅलिटी शो असेल. नेहाला आपण ‘बालिका वधू’, ‘डोली आरमानो की’, ‘महादेव’ आदी मालिकांमध्ये पाहिले आहे. तर रिद्धिमा ‘बहू हमारी रजनीकांत’मध्ये दिसली आहे.

बिग बॉस चा हा सिझन प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर होस्ट करणार आहे. करण जोहरने त्याच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत ही माहिती दिली. “ओके, मी आलोय…#bigbossOTT चा होस्ट…भरपूर मजा, मस्ती…वेडेपणा आणि भरपूर मसाला…लवकरच…” असं म्हणत करणने त्याचा फोटो सुद्धा शेअर केला आहे.

बिग बॉस या शोचे सुरवातीचे सहा आठवडे ओटीटीवर करण जोहर होस्ट करताना दिसणार आहे. बिग बॉस ओटीटीवर प्रदर्शित केल्यानंतर बिग बॉस १५ पुन्हा कलर्स चॅनलवर दिसणार आहे. या सीजनमध्ये खूप बदल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या बदलेल्या पद्धतीत काय नवीन आहे? कोण कोणते कलाकार स्पर्धक म्हणून दिसणार आहेत? असे बरेच प्रश्न सध्या आहेत. या पर्वात सामान्य माणूस देखील सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘रूद्र’ वेबसीरिजमधून अजय देवगण करणार ओटीटीवर पदार्पण; म्हणाला, ‘वाद चालूच असतात आणि…’

-जेव्हा ६४ वर्षीय ‘बिग बीं’नी १९ वर्षाच्या अभिनेत्रीसोबत केलं होतं लिप-लॉक, चाहत्यांमध्ये पसरली होती तीव्र नाराजी

-जेव्हा श्रॉफ परिवार जगायचे हलाखीचे जीवन; घरातील मूलभूत सामान विकून करावा लागला होता उदरनिर्वाह….


Leave A Reply

Your email address will not be published.