Monday, March 4, 2024

अय्याे! सर्वांसमाेर वरुण धवनने हाॅलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला केले ‘किस’, एकदा व्हिडिओ पाहाच

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचा उद्घाटन सोहळा दोन दिवस मुंबईत चालला.’इंडिया इन फॅशन’ नावाने हा कार्यक्रम मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी या इव्हेंटमध्ये अंबानी कुटुंबापासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंतची फॅशन पाहायला मिळाली. यादरम्यान प्रियांका चोप्रा जोनास, गौरी खान, सुहाना खान, सोनम कपूर, आर्यन खान, श्रद्धा कपूर, जान्हवी कपूर, दिशा पटनी ते सलमान खान आणि हॉलिवूड अभिनेत्री गिगी हदीदसह स्टार्स रेड कार्पेटवर दिसले.

इतकेच नाही, तर अनेक सेलिब्रिटींनी डान्स परफॉर्मन्सही दिला. शाहरुख खानने तर रणवीर सिंग आणि वरुण धवनला त्याच्या ‘पठाण’ चित्रपटाच्या टायटल ट्रॅकवरही डान्स करायला लावला होता. अशात वरुणने हॉलिवूड अभिनेत्री गिगी हदीदसोबतही स्टेजवर डान्स केला. यादरम्यान वरुणने अभिनेत्रीला उचलून तिचे चुंबन घेतले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

नीता आणि मुकेश अंबानी यांच्या या आलिशान कल्चरल इवेंटमध्ये देश-विदेशातील अनेक सेलिब्रिटींनी आपली उपस्थिती दर्शवली. अमेरिकन मॉडेल आणि फॅशन आयकॉन गिगी हदीदने या कार्यक्रमात ग्लॅमरस पदार्पण केले. तिचा लूक पाहून सगळेच अवाक् झाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

हा व्हिडिओ पाहताच सोशल मीडिया युजर्स वरुण धवनला ट्रोल करत आहेत. एका युजरने लिहिले की, ‘हे आवश्यक नव्हते.’, तर आणखी एका युजरने लिहिले की, वरुण धवनने गिगीला का उचलले? हे त्याच्या कडून अपेक्षित नव्हते.

अभिनेत्री गिगी हदीद ही एक अमेरिकन फॅशन मॉडेल आहे, जिने उद्योगातील सर्वात मोठ्या फॅशन डिझायनर्ससाठी रनवे केला आहे. गिगी हदीदने वयाच्या अवघ्या दुसऱ्याच वर्षीच मॉडेलिंगला सुरुवात केली होती. 1995 मध्ये जन्मलेली हदीद ही बेव्हरली हिल्सची स्टार मॉडेल योलांडा हदीदची मुलगी आहे. (bollywood actor varun dhawan danced by lifting hollywood actress gigi hadid)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘भोला’नंतर पुन्हा ‘या’ सिनेमाच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर दिसणार अजय आणि तब्बूची सुपरहिट जोडी

अजय देवगणच्या 30 वर्षाच्या मोठ्या कारकिर्दीत अभिनेता झाला होता ‘या’ अभिनेत्रींच्या प्रेमात वेडा

हे देखील वाचा