Thursday, April 18, 2024

बॉलिवूडच्या ‘या’ काही चित्रपटांनी प्रभावीपणे पडद्यावर मांडले आई-वडिलांचे नाते

आजकाल एक नवी प्रथाच आली आहे. प्रत्येक नाते सेलिब्रेट करण्यासाठी एक विशेष तारीख ठरवण्यात आली आहे. परंतु, अनेकदा असे म्हटले जाते की, कोणतेही नाते सेलिब्रेट करण्यासाठी दिवसांची आणि तारखेची गरज नाही, तर प्रत्येक दिवशी नाते जपून त्याच्यात प्रेमाची गोडी निर्माण करणे गरजेचे आहे. नात्यासाठी दिवस असणे गरजेच नाही, तर दिवसेंदिवस नात उत्तम निभावण्याची गरज आहे. दरवर्षी २६ सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय कन्यादिन साजरा केला जातो.

कन्यादिनानिमित्त सर्वच पालक आपल्या मुलींसोबत आनंदी क्षण घालवून त्यांना भेटवस्तू देतात. तसेच त्यांच्या ज्या काही इच्छा आहेत, त्या पुर्ण करतात. प्रत्येक कुटुंबात आई-वडिलांशी मुलीचे असलेले नाते फारच वेगळे असते. याच आई-वडिलांचे आणि मुलीचे नाते दाखवून देणारे आतापर्यंत अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. हेच चित्रपट अनेक पालकांचे प्रेरणास्थान बनले. चला तर मग आज पाहुयात हे चित्रपट आहेत तरी कोणते?

थप्पड
‘थप्पड’ या चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नूने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटात एक विवाहित जोडपे दाखवले होते. मध्यमवर्गीय कुटुंबात जीवन जगत असणारी मुलगी लग्न होऊन सासरी जाते. लग्नानंतरही ती पत्नी, सुन, मुलगी आणि बहीणीची भूमिका चोखपणे बजावत असते. फक्त वडिलांच्या इच्छेसाठी ती आपली स्वप्न मोडून कुटुंबातील व्यक्तींची काम करते. परंतु, तेव्हाच खरी तिच्या जीवनाला ‘थप्पड’ लागते. घरात पार्टी सुरू असताना पती तिला ‘थप्पड’ मारतो आणि तिचा स्वाभिमान जागा होतो. यावेळी सर्व कुटुंबाच्या विरोधात जाऊन ती एक निर्णय घेते, त्यावेळी तिचे वडील तिच्या बाजूने उभे राहतात. हा चित्रपट एका मुलीच्या निस्वार्थी प्रेमावर आधारित आहे.

गुंजन सक्सेना
प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते की, आपल्या मुलीने शिकून मोठ व्हावं, नाव कमवाव. परंतु, जेव्हा पुरुषांचे वर्चस्व असणाऱ्या क्षेत्रात मुली त्यांचे करिअर निवडतात, तेव्हा वडील आपल्या मुलीला तिचे करिअर पुर्ण करण्यासाठी झटतात. हा चित्रपट जान्हवी कपूर आणि पंकज त्रिपाठी यांच्या अनोख्या नाटयवर आधारित आहे. त्याचबरोबर या चित्रपटात वडील आणि मुलीमध्ये असलेले नाते सुरेख पद्धतीने दाखवले आहे. ‘गुंजन सक्सेना’ चित्रपट प्रत्येक पालकांना आपल्या मुलीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रवृत्त करतो.

 

त्रिभंग :

एका विखुरलेल्या कुटुंबाची कहानी ‘त्रिभंग’ चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात एक मुलगी आपल्या पालकांचा तिरस्कार करताना दिसते. पण असे म्हटले जाते की, कोणत्याही आई-वडिलांना आपली मुलं कशीही असली, तरी ती त्यांच्यासाठी अमूल्य असतात. तसेच एक मुलगीआईचा तिरस्कार करत असतानाही, तिची आई तिची कधीच साथ सोडत नाही. हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

माॅम :
‘माॅम’ या चित्रपटात श्रीदेवीच्या मुलीवर बलात्कार होतो. त्यानंतर तिची आई जी भूमिका बजावते, ते पाहून प्रत्येक आईला नवी उमेद मिळते. श्रीदेवी यांच्या या चित्रपटला प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद मिळाला. कालीमातेच रूप धारण करून आपल्या मुलाला न्याय कसा मिळवून देता येईल याचे उदाहरण या चित्रपटात दाखवण्यात आले. हा चित्रपट ७जुलै २०१७ साली प्रदर्शित झाला. यातील श्रीदेवी यांच्या भूमिकाला अधिक लोकप्रियता मिळाली.

 

या आणि यांसारख्या अनेक सिनेमांनी मुलींना प्रत्येक बाबतीत पाठिंबाच दिला.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जन्मापासून आतापर्यंतचे निवडक फोटो शेअर करत स्वप्नील जोशीने लेकीला दिल्या जागतिक कन्यादिनाच्या शुभेच्छा

‘अपने पास बहुत पैसा है,’ म्हणत नेहाने अनोख्या अंदाजात दिल्या परीला कन्यादिनाच्या शुभेच्छा

-अखेर प्रतीक्षा संपली, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार रणवीर सिंग अन् दीपिका पदुकोणचा ‘८३’ चित्रपट

हे देखील वाचा