‘…तुम्ही सदैव जिवंत राहाल’, प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग यांच्या निधनावर फरहान अख्तरचे भावुक पत्र


फ्लाईंग शीख मिल्खा सिंग यांच्या निधनामुळे देशभरात शोकाची लाट उसळली आहे. शुक्रवारी, १८ जून रोजी कोरोनामुळे त्यांचे निधन झाले. मे महिन्यातच त्यांची कोव्हिडची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. मात्र हा लढा ते जिंकू शकले नाहीत आणि काल रात्री ११:३० वाजता, वयाच्या ९१व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

आज त्यांची देशभर चर्चा होत आहे. अशामध्ये ‘भाग मिल्खा भाग’ या बायोपिक चित्रपटात मिल्खा सिंगची भूमिका साकारणारा अभिनेता फरहान अख्तरही खूप दुःखी झाला आहे. मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली वाहताना त्याने एक भावुक पत्र लिहिलं आहे, जे त्याने इंस्टाग्राम आणि ट्विटरवर शेअर केले आहे.

फरहान अख्तरने त्याच्या पत्रात लिहिलं आहे की, “प्रिय मिल्खा जी, माझ्यामध्ये एक भाग असाही आहे, जो तुमचा मृत्यू स्वीकारू शकत नाही. कदाचित हा तोच हट्टीपणा आहे, जो मी तुमच्याकडून शिकलो आहे. ही तीच भावना आहे, जी तुमच्या मनात घर करते आणि कधीच तिथून जात नाही. सत्य हे आहे की, तुम्ही सदैव जिवंत राहाल. कारण तुम्ही एक मोठ्या मनाचे, प्रेमळ आणि साधे व्यक्ती आहात.”

आपल्या भावना व्यक्त करत पुढे फरहानने लिहिलं, “तुम्ही एका कल्पनेचे प्रतिनिधित्व केले. तुम्ही एका स्वप्नाचे प्रतिनिधित्व केले. कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि चिकाटी एखाद्याला जमिनीपासून आकाशपर्यंत कशी नेते, तुम्ही याचे प्रतिनिधित्व केले आहे. तुम्ही आमच्या सर्वांच्या जीवनात एक छाप सोडली आहे. मी तुमच्यावर पूर्ण मनापासून प्रेम करतो.”

राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘भाग मिल्खा भाग’ मध्ये, फरहान अख्तरने मिल्खा सिंग यांची भूमिका अतिशय उत्तमरीत्या साकारली होती. केवळ प्रेक्षकांकडूनच नव्हे, तर समीक्षकांकडून देखील या चित्रपटाने वाहवा मिळवली होती. तसेच बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट हिट ठरला होता. याशिवाय स्वतः मिल्खा सिंग यांनी देखील फरहानचे खूप कौतुक केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शिल्पाने पती राज कुंद्राबाबत केला मोठा खुलासा; ‘सुपर डान्सर ४’ च्या मंचावर सर्वांसमोर म्हणाली…

-दुःखद : शेखर सुमन यांच्या आईचे निधन; सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत दिली माहिती

-आर्थिक अडचणींमुळे करावी लागली चोरी; ‘क्राइम पेट्रोल’, ‘सावधान इंडिया’ फेम ‘या’ दोन अभिनेत्रींना ठोकण्यात आल्या बेड्या


Leave A Reply

Your email address will not be published.