Friday, March 29, 2024

प्रसिद्ध दिग्दर्शकाने परखड मत मांडत काढली बॉलिवूडकरांची खरडपट्टी; म्हणाले, ‘गुटखा विकून 50 कोटी…’

बॉलिवूड कलाकार अभिनयातून बक्कळ पैसा कमावतात. मात्र, अभिनयाव्यतिरिक्त इतर गोष्टींमधूनही ते पैसे कमावत आहेत. यामध्ये सोशल मीडियावरील पेड पोस्टिंग असेल किंवा वेगवेगळ्या ब्रँडच्या जाहिराती. असे असले, तरीही काही कलाकार पैशांच्या हव्यासापोटी अशा काही जाहिराती करतात, ज्या चाहत्यांच्या पचनी पडत नाहीत. ते त्या जाहिरातीवर निशाणा साधत ट्रोल करतात. आता इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते प्रकाश झा यांनीही परखड मत मांडले आहे.

काय म्हणाले प्रकाश झा?
माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत प्रकाश झा (Prakash Jha) म्हणाले की, “असे 5-6 कलाकार राहिले आहेत. या कलाकारांच्या अटी पाहा. जर या लोकांना गुटखा जाहिरातीतून 50 कोटी रुपये मिळत असतील, तर हे लोक माझ्या सिनेमात काम का करतील. हे कलाकार गुटखा विकत आहेत. हे दिग्गज कलाकार नेमकं काय करत आहेत, याचा विचार करू शकता का?”

सिनेमांच्या वाईट कंटेंटला कोण जबाबदार?
प्रकाश झा यांनी सिनेमांच्या वाईट कंटेंटबद्दलही चर्चा केली. ते म्हणाले की, “जर कलाकारांना माहिती आहे की, त्यांना 4 सिनेमांमधून 400 कोटी रुपये मिळणार आहेत, तर ते कलाकार सिनेमांच्या कंटेंटशी संबंधच ठेवणार नाहीत.” पुढे बोलताना झा म्हणाले की, “खरं तर, एक अभिनेता कंटेंट निर्मिती करत नाही. हे काम लेखक आणि दिग्दर्शकाचे आहे. जर लेखक आणि दिग्दर्शकाने वेळ घेऊन काम केले, तर ते चांगले बनवू शकतात.”

आता प्रकाश झा यांनी त्यांच्या मुलाखतीत कोणत्या कलाकारांवर टीकास्त्र सोडलंय, याचं उत्तर तर तेच देऊ शकतात. मात्र, त्यांनी त्यांचे मत निर्भीडपणे सर्वांपुढे ठेवले आहे. दुसरीकडे, प्रकाश झा यांच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी नुकताच ‘मट्टों की सायकिल’ हा सिनेमा बनवला आहे. हा सिनेमा 16 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॉलिवूडवर बहिष्काराच्या ट्रेंडमध्ये ‘हे’ हिंदी कलाकार साउथच्या सिनेमात करणार पदार्पण
‘कामामध्ये आव्हान हेच आयुष्याचे खरे यश,’ दुलकर सलमानने शेअर केला अनुभव
‘म्हणून मी यंदाचा वाढदिवस साजरा करणार नाही,’ अभिनेते अमोल कोल्हेंनी पोस्ट शेअर करत सांगितले कारण

हे देखील वाचा