‘म्हणून मी यंदाचा वाढदिवस साजरा करणार नाही,’ अभिनेते अमोल कोल्हेंनी पोस्ट शेअर करत सांगितले कारण

0
72
amol-kolhe
Photo Courtesy: Instagram/amolrkolhe

अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. आपल्या दमदार अभिनयाने आणि अनेक आव्हानात्मक भूमिका साकारत त्यांनी सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज (18, सप्टेंबर) अमोल कोल्हे त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यामुळेच सोशल मीडियावरुन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. मात्र अमोल कोल्हेंनी यंदा त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दलची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. 

अमोल कोल्हे हे मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते आहेत. त्यांनी अनेक ऐतिहासिक भूमिका साकारत आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या ऐतिसाहिक भूमिका प्रचंड गाजल्या. त्या भूमिकांनी अमोल कोल्हे यांना नवी ओळख मिळवून दिली. आपल्या अभिनयाइतकेच ते सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतात. सध्या त्यांची एक पोस्ट चर्चेत आली आहे ज्यामध्ये त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन केले आहे.

या व्हायरल पोस्टमध्ये त्यांनी “अवकाळी पाऊस व लंपी आजारामुळे आज बळीराजा संकटात आहे. माझा हा शेतकरी बांधव संकटात असल्याने मी यंदाचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतलाय! आपल्या शुभेच्छा कायम माझ्यासोबत आहेत, असा मला विश्वास आहे,” असे सांगत त्यांच्या चाहत्यांना आणि कार्यकर्त्यांना वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, अमोल कोल्हे अभिनयाप्रमाणेच राजकारणातही सक्रिय आहेत. सध्या ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि शिरुर मतदार संघाचे खासदारही आहेत. त्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे अनेकांनी कौतुक केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर

हेही वाचा- …म्हणून ‘झलक दिखला जा’च्या मंचावर ढसाढसा रडला करण जोहर, जाणून घ्या कारण
‘आमच्या रोजगारावर परिणाम होतोय’, बॉयकॉट ट्रेंडमुळे दिग्गज अभिनेत्रीने व्यक्त केला संतापरणवीर सिंगच्या ‘त्या’ कृत्याने जिंकली चाहत्यांची मने, सोशल मीडियावर होतोय कौतुकाचा वर्षाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here