‘किस मी मोर’ गाण्यावर थिरकली दिशा पटानी; टायगर श्रॉफच्या कमेंटने वेधले सर्वांचे लक्ष


‘नॅशनल क्रश’ या नावाने ओळखली जाणारी बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे दिशा पटानी होय. तिच्या आगळ्या- वेगळ्या फॅशन सेन्समुळे ती नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे, तर कधी व्यावसायिक आयुष्यामुळे ती नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. अशातच तिचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दिशा ‘किस मी मोर’ या इंग्लिश गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. (Disha patani dance on kiss me more song, video get viral)

दिशाने तिचा हा डान्स व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दिशा ‘किस मी मोअर’ या इंग्लिश गाण्यावर जोरदार डान्स करत आहे. या व्हिडिओमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि पांढऱ्या रंगाची पँट घातली आहे. तसेच तिने एक चष्मा देखील घातला आहे. त्यामुळे ती खूपच कूल दिसत आहे.

हा डान्स व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “किस मी मोअर डान्स माझ्या आवडीचे कोरिओग्राफर @shariquely, @ankan_sen 7 यांनी कोरिओग्राफ केला आहे.” तिचा हा डान्स व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडत आहे. सगळेजण तिच्या या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. यामध्ये एका कमेंटने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ते म्हणजे अभिनेता टायगर श्रॉफच्या कमेंटने.

टायगरने कमेंट करत लिहिले आहे की, “दिस इज सो कूल.” यासोबतच टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफने देखील तिच्या या डान्स व्हिडिओचे कौतुक केले आहे.

दिशा ही बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफसोबत असलेल्या तिच्या नात्यामुळे खूप चर्चेत आहे. त्या दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट केले जाते. केवळ पडद्यावरच नाही, तर वैयक्तिक आयुष्यात देखील त्यांची केमिस्ट्री खूप चांगली आहे. त्या दोघांनी त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली नाही, पण त्यांना अनेक ठिकाणी एकत्र पाहिले जाते. तसेच सोशल मीडियावर एकमेकांच्या फोटोवर कमेंट करत असतात.

दिशा केवळ एक सुंदर अभिनेत्री नाही, तर एक ऍप डेव्हलपर आहे. तिने एक ऍप डेव्हलप केला आहे. ज्याद्वारे ती तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. तिचा हा ऍप प्ले स्टोरवर देखील आहे. तिने बॉलिवूडमध्ये ‘एमएस धोनी’, ‘बाघी 2’, ‘मलंग’, ‘भारत’ आणि ‘राधे’ या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.