जबरदस्त! ‘तूफान’साठी फरहान अख्तरने तीन वेळा बदलला लूक; ट्रान्सफॉर्मेशन पाहून तुम्हीही घालाल तोंडात बोटे


आपला सिनेमा हिट व्हावा, यासाठी प्रत्येक चित्रपटाची संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेते. कलाकार तर त्यांची भूमिका खरी वाटावी आणि प्रेक्षकांशी लगेच जोडली जावी, यासाठी कलाकार स्वतः वर खूप मेहनत घेतात. वजन कमी करणे, वजन वाढवणे आदी हे तर खूपच सामान्य झाले आहे. मात्र, एकाच चित्रपटात आपले दोन लूक दाखवणे तेही एक वजन कमी असलेला आणि एक वजन जास्त असलेला, हे दिसायला आणि ऐकायला साधे वाटत असले, तरी खूपच अवघड आहे. काही कलाकार त्यांच्या कामाप्रती इतके एकनिष्ठ आणि समर्पित असतात की, ते सर्व आव्हान पेलण्यासाठी तयार असतात. असाच एक कलाकार म्हणजे फरहान अख्तर.

नुकताच फरहानचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘तूफान’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमात फरहान एका बॉक्सरची भूमिका साकारत आहे. हा सिनेमा सध्या चांगलाच लोकप्रिय होताना दिसत आहे. चित्रपटाला समीक्षकांसोबतच प्रेक्षकांनीही दमदार प्रतिसाद दिला आहे. फरहानच्या अभिनयापासून ते त्याच्या लूकपर्यंत सर्वच बाबतीत तो कौतुकास पात्र ठरत आहे. नुकताच त्याने त्याचा एक फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये त्याने तीन फोटो कोलाज केले आहेत. हे फोटो त्याचे ट्रान्सफॉर्मेशनचे असून सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनले आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगवेळी फरहानने कसे त्याचे वजन कमी केले, वाढवले हे त्यात दिसत आहे.

हा फोटो शेअर करत त्याने लिहिले की, “तूफानसाठी अज्जू उर्फ अजीजचे अनेक शेप्स आणि साईज. काय प्रवास होता हा. कठोर मेहनतीचे १८ महिने. मात्र, घामाचा प्रत्येक थेंब, प्रत्येक मांसपेशांचा त्रास आणि शरीराचे वाढणारे आणि कमी होणारे वजन.”

फरहानने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये तो ६९.८ किलो वजनाचा दिसत आहे, दुसऱ्या फोटोमध्ये ८५.० किलो, तर तिसऱ्या फोटोमध्ये ७६.९ किलो वजनाचा दिसत आहे. या मोठ्या आणि अद्वितीय ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो सध्या कलाकार आणि फॅन्समध्ये चर्चेचा विषय बनले आहेत. कलाकार देखील या फोटोंवर कमेंट करत आहे. ऋतिक रोशनने या फोटोंवर कमेंट करत लिहिले की, “माणसा ६९ ते ८५ हा प्रवास आश्चर्य कारक आहे.” व्हीजे अनुषाने लिहिले, “वाव.” दुसरीकडे गर्लफ्रेंड शिवानी दांडेकरने लिहिले, “या तिघांवर माझे प्रेम आहे.”

‘तूफान’ सिनेमाचे दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी केले असून यात फरहानसोबत मृणाल ठाकुर आणि परेश रावल मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात त्याची मेहनत स्पष्ट दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दमदार! जिममध्ये घाम गाळतानाचा दिसला ‘चॉकलेट बॉय’ कार्तिक आर्यन; टोन्ड बॉडी केली फ्लॉन्ट

-जस्टिन बिबरचे चालते फिरते घर पाहिले का? दिग्गज कलाकारांच्या बंगल्यालाही टक्कर देईल त्याची आलिशान बस

-‘असं चोरी करणं बरोबर दिसतं का?’ शालूच्या लेटेस्ट व्हिडिओवर युजरची लक्षवेधी कमेंट आली चर्चेत


Leave A Reply

Your email address will not be published.