फरहान अख्तरच्या ‘तूफान’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित, ऐकून तुमच्यातील फायटर देखील होईल जागा


फरहान अख्तरचा आगामी चित्रपट ‘तूफान’ मागील अनेक दिवसांपासून प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनला आहे. या चित्रपटातील पहिले गाणे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याचे बोल आहेत ‘तोडून टाक’ हे गाणे तुमच्यातील फायटरला नक्कीच जागे करेल. हे एक रॅप साँग आहे. यासाठी एक्सेल एंटरटेनमेंट आणि डब शर्माने हात मिळवला आहे. (Farhan Akhtar’s toofan movie first Todun tak song release)

त्यांनी याआधी ‘गली बॉय’मधील सुपरहिट गाणे ‘अपना टाईम आयेगा’मध्ये सोबत काम केले होते. या गाण्याला डब शर्मा यांनी कंपोज केले आहे. तसेच डी एविलने हे गाणे लिहिले आहे. तरया गाण्याला आवाज देखील दिला आहे.

प्रत्येक योध्याला त्याच्या आतील फायटरला जागे करणारे ‘तोडून टाक’ हे गाणे आहे. आपल्या गाण्यांच्या माध्यमातून वास्तविक आयुष्याची प्रतिकृती रेखाटण्यासाठी हिप हॉप कलाकार डी एविल यांचा हातखंडा आहे. त्यांचे हे गाणे देखील प्रेक्षकांना खूपच आवडले आहे. या गाण्यामध्ये फरहान अख्तरला अग्रेसिव मूडमध्ये पाहू शकता. ज्याच्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची आग दिसत आहे.

या चित्रपटात फरहान अख्तरसोबत मृणाल ठाकूर, परेश रावल, सुप्रिया पाठक कपूर, हुसैन दलाल, मोहन आगाशे, दर्शन कुमार आणि विजय राज महत्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. एक्सेल एंटरटेनमेंट आणि ROMP पिक्चर्स निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम प्रकाश मेहरा यांनी केले आहे. ‘तूफान’ हा चित्रपट भारतासोबत 240 देशात आणि क्षेत्रात 16 जुलै, 2021 रोजी ऍमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.

नुकतेच काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्सरवर आधारित आहे. हा बॉक्सर सुरुवातील रस्त्यावरील एक मारामारी करायचा. त्यानंतर तो देशातील बॉक्सिंग स्पर्धेमध्ये भाग घेतो. फरहान अख्तर या चित्रपटात बॉक्सर आहे, तर त्यांच्या कोचच्या भूमिकेत परेश रावल आहेत. हा कोच या बॉक्सरचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. या चित्रपटाची संपूर्ण कहाणी बघण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.