Tuesday, June 25, 2024

हरियाणा की छोरी का दम देखा क्या?, एक हात पडताच ‘ही’ व्यक्ती पडली खाली

सोशल मीडियावर सक्रिय राहण्यासाठी कलाकार त्यांचे फोटो, कुटुंबातील सदस्यांचे फोटो, विविध व्हिडिओ शेअर करत असतात. मागील काही दिवसांपासून सोसहल मीडियावर फनी व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होत आहे. त्यामुळे सामान्य लोकांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वच असे फनी व्हिडिओ तयार करताना दिसतात. कलाकारांचे फनी व्हिडिओ खूपच प्रसिद्ध होतात. बॉलिवूड कलाकारांसोबत इतर इंडस्ट्रीमधील कलाकार देखील मोठ्याप्रमाणावर असे फनी व्हिडिओ बनवताना दिसतात.

हरियाणातील प्रसिद्ध डान्सर असणारी सपना चौधरी देखील सोशल मीडियावर खूपच सक्रिय आणि प्रसिद्ध आहे. बिग बॉसमध्ये सहभाग घेतल्यानंतर फक्त हरियाणा आणि आजुबाजुच्या परिसरात प्रसिद्ध असणाऱ्या सपनाला संपूर्ण जगात ओळख मिळाली. मात्र मागील काही काळापासून सपना जास्त प्रकाशझोतात येत नाही. तरीही तिच्या फॅन्ससाठी ती सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना दिसते. नुकताच तिने तिचा एक फनी व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सपना चौधरीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती तिच्या जुन्या एका मित्राची सर्वांना ओळख करून देताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये लोअर टि शर्ट घालून तिच्या शेजारी असणाऱ्या व्यक्तीचे नाव सांगत आहे. व्हिडिओमध्ये सपना म्हणते, ” तर मित्रांनो, हा आहे आपला मित्र टिंकू. आणि हा अमेरिकेतून आला आहे.” असे बोलत असताना ती तिच्या मित्राच्या छातीवर हलकासा हात मारते, मात्र तो मित्र तिचा हा हातही सहन करू शकत नसल्याने लगेच मागे असलेल्या सोफ्यावर जाऊन पडतो. त्याला पडताना पाहून सपना चुपचाप निघून जाते.

सपनाने तिचा हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “असेच मजेदार रिल्स बघण्यासाठी मला फॉलो करा. सपना बऱ्याच म्युझिक व्हिडिओमध्ये दिसून येते. तिची लोकप्रियता तुफान असल्यामुळे तिचे गाणे प्रदर्शित झाले की लगेचच गाजते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर कंगनाने दाखल केली एफआयआर, म्हणाली ‘मी फालतू धमक्यांना घाबरत नाही’

-जसप्रीत बुमराहसोबत जोडलं जायचं राशी खन्नाचं नाव, तर आज ‘इतक्या’ संपत्तीची मालकीण आहे अभिनेत्री

-पर्यटकांसाठी अडचण बनले कॅटरिना कैफ अन् विकी कौशलचे लग्न? ‘अशी’ झालीय रणथंबोरमध्ये परिस्थिती

हे देखील वाचा