Saturday, April 20, 2024

पं. भीमसेन जोशी यांची पुण्यतिथी! वडिलांच्या विरोधामुळे ११व्या वर्षी सोडलं घर; जाणून घ्या ‘स्वरभास्कराची’ जीवनकहाणी

भारतरत्न, स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी (Pandit Bhimsen Joshi) आज जरी आपल्यात नसले तरी ते त्यांच्या गाण्यांनी आणि संगीताने सदैव सर्वांच्या मानत अमर आहेत. शास्त्रीय संगीताला एका शिखरावर नेण्याचे आणि संजीवनी देण्याचे अमूल्य कार्य पंडितजींनी केले. सोमवारी (२४ जानेवारी) भीमसेन जोशी यांची पुण्यतिथी असते.

शास्त्रीय संगीताचे जेव्हा जेव्हा नाव घेतले जाते तेव्हा तेव्हा भीमसेन जोशी यांचे नाव येतेच. शास्त्रीय संगीत आणि भीमसेन जोशी हे दोन्ही एकमेकांना पूरक असल्याने भीमसेन जोशी यांच्या नावाशिवाय शास्त्रीय संगीत अपूर्ण आहे. त्यांनी त्यांचे संपूर्ण जीवन संगीताला वाहून घेतले होते. आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण जाणून घेऊया त्यांच्या या संगीतमय प्रवासाबद्दल.

pt bhimsen joshi
pt bhimsen joshi

पंडितजींचा जन्म ४ फेब्रुवारी १९२२ रोजी कर्नाटकच्या गदग येथे झाला. त्यांचे वडील पेशाने शिक्षक होते. ते संस्कृत, कन्नड आणि इंग्रजी विषयांमध्ये निपुण होते. त्यांच्या आई अतिशय सुमधुर आवाजात घरात भजने गायच्या. त्यांचे काका जी.बी जोशी हे प्रसिद्ध नाटककार होते. तर त्यांचे आजोबा लोकप्रिय कीर्तनकार होते.

त्यांच्या घरात संगीताचे वातावरण असल्यामुळे पंडितजींचा सुरुवातीपासूनच संगीताकडे प्रचंड ओढा होता. रात्रंदिवस ते संगीतातच रामबाण असायचे. मात्र, त्यांच्या वडिलांना पंडितजींचे संगीतप्रेम रुचत नव्हते. त्यांना आपल्या मुलाने डॉक्टर, इंजिनियर व्हावे असे वाटायचे. वडिलांची ही इच्छा त्यांना आवडत नव्हती, म्हणून वयाच्या ११ वर्षी पंडितजींनी त्यांचे घर सोडले आणि ते उत्तरप्रदेशमधील ग्वाह्लेरमध्ये दाखल झाले.

तिथे त्यांनी उस्ताद अब्दुल करीम खान, केसरबाई केरकर, वझेबुवा, उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे गायन आणि वादन ऐकले. त्यानंतर काही काळाने त्यांनी उस्ताद इनायत खा यांचे शिष्य जन्नाप्पा कुर्तकोटी यांना गुरु बनवले आणि त्यांच्याकडे ते गायन शिकले. पुढे त्यांनी जालंधर येथील पंडित मंगतराम, ग्वाह्लेर येथील राजाभय्या पूंछवाले, रामपूर येथे उस्ताद मुश्ताक हुसेन खा यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले.

इकडे त्यांचे वडील त्यांचा खूप शोध घेत होते, हा शोध घेत असतानाच त्यांची आणि पंडित भीमसेन जोशी यांची भेट झाली. आपल्या मुलाचे संगीतावरील प्रेम आणि संगीत शिकण्याचा ध्यास पाहून त्यांनी पंडितजींना कुंदगोळ गावात घेऊन गेले, आणि तेथील रामभाऊ कुंदगोळकर यांना त्यांचे गुरु केले.

pt. bhimsen joshi DB
pt. bhimsen joshi DB

पुढे त्यांनी रामभाऊ म्हणजेच सवाई गंधर्व यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले. रामभाऊ हे किराणा घराण्याचे मोठे आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायक होते. त्यांनी पंडितजींकडून तोंडी, पुरिया, मुलतानी या रागांवर सराव तीन वर्षे चालला. त्यानंतर आसावरी, पूरिया धनश्री, तोडी, पूरिया, भैरवी, नटमल्हार ह्या रागांचा गंधर्वांनी केलेला रियाज ऐकून गायनातील काळाचे अचूक भान व घराण्याच्या शिस्तीचे धडे मिळाले.

मंद्र व तारसप्तकात आवाज सहजपणे फिरावा म्हणून भीमसेनांनी दिवसाकाठी चौदा-चौदा तास मेहनत केली. त्यामुळे प्रसन्न होऊन गंधर्वांनी त्यांना उदरहस्ते संगीताचे शिक्षण दिले. दररोज ८ तास ते संगीताचा रियाज करत. पंडितजींनी रोज १६ तास रियाज करण्याचा दंडक शेवटपर्यंत पाळला.

सन १९४१ साली त्यांनी पहिल्यांदा स्टेजवर त्यांचे गाणे सादर केले. त्यानंतर त्यांनी हिंदी आणि कन्नड भाषेत अनेक भक्तिगीतं गायली. पुढे आकाशवाणीवरील कलाकार म्हणून काम करण्यासाठी त्यांनी मुंबई गाठले, आणि ते रेडिओवर काम करू लागले. १९५२ साली त्यांच्या गुरूंचे सवाई गंधर्वांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ पंडितजींनी १९५३ सालापासून पुण्यात ‘सवाई गंधर्व पुण्यतिथी संगीत महोत्सव’ सुरू केला.

पं. भीमसेन जोशी हे त्यांच्या बुलंद आवाजासाठी, श्वासावरच्या कंट्रोलसाठी, संगीताबद्दल प्रचंड प्रेम याबदल ते ओळखले जायचे. त्यांनी ‘सुधा कल्याण’, ‘मियां की तोड़ी’, ‘भीमपलासी’, ‘दरबारी’, ‘मुलतानी’, रामकाली असे अनेक राग गात त्यांनी रसिकांची मने जिंकली. पंडित मोहनदेव यांनी भीमसेन जोशी यांच्याबद्दल सांगितले होते की, ‘त्यांच्या गाण्यावर केसरबाई केरकर, उस्ताद आमिर ख़ान, बेगम अख़्तर यांचा खूप मोठा प्रभाव दिसतो.’ भीमसेन जोशी यांनी मराठी, कन्नड आणि हिंदीमध्ये असंख्य भजन गायिले.

पंडित भीमसेन जोशी यांना शास्त्रीय गाण्याचे विद्यापीठ म्हटले जाते. नवख्या गायकांना खयाल गाणे शिकण्यासाठी नेहमी पंडितजींची गाणे ऐकण्याचा सल्ला दिला जातो. भीमसेन जोशी यांनी पं. हरिप्रसाद चौरसिया, पं. रविशंकर, बाल मुरली कृष्णा यांच्यासोबत अनेक लोकप्रिय जुगलबंद्या केल्या आहेत. त्यांना आजच्या काळातले गायन कधीच रुचले नाही. त्यांनी याबद्दल सांगितले होते की, “मी गुलाम अली, उस्ताद अमीर ख़ाँ आणि गुरुजी यांना ऐकले आहे, त्यामुळे आजच्या गायकांमध्ये ती क्षमता, आवड, उत्तम गाणे असले तरी माझ्यातरी मनाला ते गाणे पोहचत नाही.”

pt bhimsen joshi Award
pt bhimsen joshi Award

पंडित भीमसेन जोशी हे शास्त्रीय संगीतातले ते नाव आहे जे जोपर्यंत संगीत असेल तोपर्यंत अमर असणार आहे. त्यांच्या गाण्यातला शुद्ध राग ऐकणाऱ्याच्या डोळ्यात पाणी आणायचा इतका मनाला भिडायचा. ते त्या काळात जायचे ज्या काळी माइक सुद्धा नव्हते. तरीदेखील त्यांचा आवाज सर्वाना स्वच्छ ऐकायला यायचा.

एक वेळ अशी होती जेव्हा शास्त्रीय संगीत हे फक्त दरबार आणि घराण्यांमध्येच कैद होते. मात्र जेव्हा गंधर्व महाविद्यालय, प्रयाग संगीत समिति आणि भातखंडे विश्वविद्यालय आल्यानंतर हे संगीत लोकांपर्यंत खूप जोरात पोहचू लागले. मात्र याचा एक दुष्परिणाम झाला की संगीताची गुणवत्ता ढासळू लागली.

भीमसेन जोशी नेहमी म्हणायचे कोणत्याही संस्थांमध्ये कलाकार जन्माला येत नाही, त्यासाठी गुरु समोर बसून त्यांना समर्पित होणेच आवश्यक होते. त्यांनी देशातून फिरून फिरून अनेक उत्कृष्ट लोकांना शोधायचे आणि त्यांना सवाई गंधर्व महोत्सवात गाण्याची संधी द्यायचे. या महोत्सवात गायला मिळणे म्हणजे प्रत्येक गायकाची अभिमानस्पद गोष्ट असते.

भीमसेन जोशी यांना अनेक लहान मोठ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांना १९७२ साली ‘पदमश्री ‘ पुरस्कार प्रदान करण्यात आला. १९८५ साली त्यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार दिला.

पुढे त्यांना १९९९ साली ‘पद्मविभूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले. ४ नोव्हेंबर २००८ साली त्यांना देशाचा सर्वोच्च पुरस्कार ‘भारतरत्न’ देऊन गौरवण्यात आले आहे. शिवाय त्यांना ‘संगीत नाटक अकादमीचा’ पुरस्कार देखील मिळाला आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा