सनी लिओनीच्या ‘अनामिका’ वेब सीरिजच्या सेटवर पोहोचून गुंडांचा धिंगाणा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण


बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून सनी लिओनी सहभागी झाली आणि संपूर्ण देशात तिला ओळख मिळाली. बिग बॉसनंतर सनी बॉलिवूडमध्ये चांगलीच सक्रिय झाली. खूप कमी वेळात तिने स्वत: ची चांगली ओळख निर्माण केली. चित्रपट, वेब सीरिज, डान्स आदींमधून ती दिसतच असते. सोशल मीडियावर देखील सनी चांगलीच सक्रिय आहे. नेहमी ती सोशल मीडियावरून अपडेट्स देताना दिसते. मात्र, मागच्या काही काळापासून सनी प्रचंड चर्चेत आहे. नुकताच तिच्यावर फसवणुकीचा आरोप करण्यात आला होता. आता पुन्हा ती चर्चेत आली आहे.

सनीच्या शूटिंग सेटवर काही स्थानिक गुंडांनी थोडावेळ कब्जा केला होता. सनी सध्या विक्रम भट्ट यांच्या आगामी ‘अनामिका’ या वेब सीरिजचे शूटिंग करत आहे. प्राप्त माहितीनुसार, अनामिकाच्या सेटवर काही गुंडांनी धिंगाना घातला होता. हे गुंड जेव्हा सेटवर घुसले, तेव्हा सनी लिओनी तिथेच शूट करत होती.

गुंडाना पाहून विक्रम भट्ट यांनी सर्वप्रथम सनी लिओनीला सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. विक्रम भट्ट यांनी ऍक्शन दिग्दर्शक अब्बास अली मोघल यांच्यासोबत काम केले आणि त्यांचे ३८ लाख रुपये मोघल यांना देणे बाकी आहे. म्हणून हे गुंड सेटवर आले असतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. या सर्व प्रकरणानंतर विक्रम भट्ट यांना शूटिंगचे लोकेशनही बदलावे लागले.

सनीने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांसोबत ही बातमी शेअर केली होती. सनीने चाहत्यांना सांगितले की, “मी माझ्या ‘अनामिका’ या नवीन वेबसीरिजचे शुटिंग सुरू केले आहे. विक्रम भट्ट दिग्दर्शित आणि लिखित या वेबसीरिजमध्ये मी पहिल्यांदा अ‍ॅक्शन सीन्स करताना तुम्हाला दिसणार आहेत.”

काही दिवसांपूर्वी तब्बल २९ लाख रुपयांची फसवणुक केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला होता. एका कार्यक्रमात सादरीकरण करण्यासाठी तिला रक्कम दिली गेली. मात्र, ती त्या कार्यक्रमाला पोहोचली नसल्याचे आयोजकांनी सांगितले होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

-नोरा फतेहीच्या ‘या’ गाण्याने लावली इंटरनेटवर आग; एकाच आठवड्यात पार केला ६ कोटी व्ह्यूजचा टप्पा, पाहा व्हिडिओ
-गावाकडच्या पोरानं आपल्या डान्सनं ‘धकधक गर्ल’ला लावले वेड; मग माधुरीनेही केली मोठी घोषणा
-बिग बींना जया बच्चन यांच्यासोबत जायचे होते लंडनला; वडील हरिवंशराय बच्चन यांना समजल्यावर म्हणाले होते, ‘आधी…’
-ए भावड्या जरा इकडं बघ! टोनी कक्करच्या ‘बूटी शेक’ गाण्यात झळकली ‘ही’ अभिनेत्री, व्हिडिओला मिळाले ९० लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज


Leave A Reply

Your email address will not be published.