Friday, March 29, 2024

आयफा २०२२: यंदाच्या तांत्रिक पुरस्कारांमध्ये ‘या’ चित्रपटांनी मारली बाजी, विजेत्यांच्या नावांची घोषणा

नवीन वर्षाची सुरुवात झाली की मनोरंजनविश्वात सर्वाना वेध लागतात ते पुरस्कारांचे. कलाकारांसोबतच प्रेक्षकही पुरस्कारांची आतुरतेने वाट बघत असतात. वर्षभर आपण केलेल्या मेहनतीची आपल्या पाठीवर मिळालेली पुरस्काररूपी थाप सर्वानाच हवीहवीशी वाटत असते. संपूर्ण बॉलिवूड एकाच ठिकाणी प्रेक्षकांना या पुरस्कार सोहळ्याच्या रूपानेच पाहायला मिळते.

कोरोनामुळे मागील दोन वर्षात कोणतेही पुरस्कार सोहळे झाले नाही, त्यामुळे आता दोन वर्षांनी मोठ्या दणक्यात आणि मोठ्या उत्साहात हे सोहळे होणार आहे. लवकरच सर्वांच्या आवडीचा आयफा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. आयफा पुरस्कार हे नेहमीच जगातील सर्वात सुंदर अशा वेगवेगळ्या शहरांमध्ये आयोजित केले जातात. यावर्षीचा आयफा सोहळा अबुधाबीमधील एस बेटावर आयोजित केला जाणार आहे. २० आणि २१ मे रोजी हा भव्य सोहळा संपन्न होणार असून, नुकतेच या सोहळ्यात तांत्रिक पुरस्कार मिळालेल्या विजेत्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. जाणून घेऊया २०२२ सालात या तांत्रिक पुरस्कारांमध्ये कोणी बाजी मारली.

फिल्म- सरदार उधम – ३ पुरस्कार
सिनेमॅटोग्राफी – अविक मुखोपाध्याय
एडिटिंग- चंद्रशेखर प्रजापति
स्पेशल इफेक्ट्स – एनवाई वीएफएक्सवाला, एडिट एफएक्स स्टूडियोज, मेन रोड पोस्ट रूस, सुपर8/बीओजेपी

फिल्म- अतरंगी रे- २ पुरस्कार
कोरियोग्राफी – विजय गांगुली (चाका चक के लिए)
बॅकग्राऊंड स्कोर- ए. आर. रहमान

फिल्म- शेरशाह – १ पुरस्कार
पटकथा – संदीप श्रीवास्तव

फिल्म थप्पड़ – १ पुरस्कार
संवाद – अनुभव सिन्हा, मृण्मयी लागू

फिल्म- तानाजी: द अनसंग वॉरियर -१ पुरस्कार
ध्वनि डिजाइन – लोचन कानविन्दे

फिल्म 83 – १ पुरस्कार
साउंड मिक्सिंग – अजय कुमार पी.बी.माणिक बत्रा

यावर्षीच्या आयफा पुरस्कारांचे सूत्रसंचालन सलमान खान, रितेश देशमुख आणि मनीष पॉल करणार असून, रणवीर सिंह, कार्तिक आर्यन, सारा अली खान, वरुण धवन, अनन्या पांडे, दिव्या खोसला कुमार, नोरा फतेही आदी कलाकार यावर्षी त्यांचा धमाकेदार परफॉर्मन्स देणार आहे. आयफा रॉक्समध्ये देवी श्री प्रसाद, तनिष्क बागची, नेहा कक्कड़, ध्वनि भानुशाली, गुरु रंधावा आणि हनी सिंह डेब्यू यावर्षी पदार्पण करणार आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा