×

सिद्धार्थ शुक्लाच्या जाण्यानंतर लग्नबंधनात अडकतेय शहनाझ गिल? व्हायरल होतोय व्हिडिओ

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला (Sidhharth Shukla) आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्याच्या मृत्यूने चाहत्यांना हादरवून सोडले. अभिनेत्याची खास मैत्रीण शहनाझ गिल (Shehnaaz Gill) तर पूर्णपणे तुटली होती. पण आता शहनाझ पुन्हा तिच्या सामान्य जीवनात परतत आहे आणि हळूहळू चाहत्यांशी कनेक्ट होत आहे. दरम्यान, अभिनेत्रीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती वधूच्या रुपात दिसत आहे.

वधूच्या वेशात दिसली शहनाझ
‘बिग बॉस १३’ या प्रसिद्ध शोमध्ये सिद्धार्थ आणि शहनाझ पहिल्यांदा भेटले होते. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि या खास मैत्रीच्या चर्चा सर्वत्र रंगू लागल्या. पण फार कमी वेळात सिद्धार्थने शहनाझची साथ सोडली. अभिनेत्याने हे जग सोडल्यानंतर शहनाझने इतरांना भेटणे आणि बोलणे बंद केले होते. काही दिवस उलटल्यानंतर, अभिनेत्रीने स्वतःची काळजी घेत स्वतःला सावरले. नुकतेच या अभिनेत्रीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये ती वधूच्या वेशात दिसत आहे. तिचे असे फोटो पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. (is shehnaaz gill getting married after sidharth shukla death see viral video)

व्हिडिओ झाला व्हायरल
सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये शहनाझ गिलने लग्नाचा पोशाख परिधान केला आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. यात शहनाझने नववधूसारखी वेशभूषा केली आहे. तिला असे पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. हे फोटो पाहून काहीजण तिच्या लग्नाबद्दल अंदाज लावत आहेत. त्याचवेळी, काहीजणांचा असा विश्वास आहे की, हे फोटो आणि व्हिडिओ तिच्या एखाद्या फोटोशूटचे आहेत.

शहनाझचे वर्कफ्रंट
शहनाज गिलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर अभिनेत्री गेल्या वर्षी ‘हौसला रख’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात शहनाझने अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझसोबत स्क्रीन शेअर केली होती. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला. या चित्रपटात शहनाझने दिलजीतची पत्नी स्वीटीची भूमिका साकारली होती. जी आपल्या मुलाला आणि नवऱ्याला सोडून आपल्या स्वप्नाकडे धावते. यातील तिचा अभिनय चाहत्याना खूप आवडला. याशिवाय अभिनेत्रीचे ‘तू येही है’ हे गाणे रिलीझ करण्यात आले. तिचे हे गाणे सिद्धार्थ शुक्लाला दिलेली श्रद्धांजली होती. हे गाणेही यूट्यूबवर येताच खूप व्हायरल झाले.

हेही वाचा :

Latest Post