कॅटरिना आणि विकीच्या नात्याचा खुलासा करणे अनिल कपूरच्या मुलाला पडले महागात; अभिनेत्री झाली नाराज


बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ ही त्या अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांना त्यांचे वैयक्तिक आयुष्य सर्वांसोबत शेअर करायला आजिबात आवडत नाही. परंतु कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्यांची प्रेम कहाणी दुनियेसमोर येतच असते. कॅटरिना कैफ ही ‘उरी’ फेम अभिनेता विकी कौशलसोबत रिलेशनमध्ये आहे. त्यांनी अजूनही त्यांच्या या नात्याचा खुलासा कोणासमोरच केला नाहीये. परंतु तरीही बॉलिवूडमध्ये त्यांच्या या प्रेम कहाणीची चर्चा खूप चाललेली असते. नुकतेच अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन कपूर याने एका चॅट शोमध्ये कॅटरिना कैफ आणि विकी कौशलच्या नात्याचा खुलासा केला आहे. त्याने सांगितले की, ते दोघे खरंच रिलेशनमध्ये आहे, पण आता त्याला त्यांच्या नात्याचा खुलासा करणे चांगलेच भारी पडले आहे.

हर्षवर्धनने अगदी मजेमध्ये ही गोष्ट सांगितली पण कॅटरिनाला ही गोष्ट अजिबात आवडली नाही. माध्यमातील वृत्तानुसार, या गोष्टीमुळे ती हर्षवर्धनवर नाराज आहे. कॅटरिनाला ही गोष्ट अजिबात आवडत नाही की, कोणत्याही चॅट शोमध्ये तिचे आयुष्य मांडले जावे. तिच्या एका जवळच्या एका मैत्रिणीने सांगितले की, “हर्षवर्धनने तिच्या आयुष्याबाबत या गोष्टी एका चॅट शोमध्ये सांगितले आहे. याला काहीच अर्थ नाही.” तिने पुढे सांगितले की, “कॅटरिना हर्षवर्धनला नीट ओळखत देखील नाही. जरी ती त्याला ओळखत असली, तरी त्याला काहीच अधिकार नाहीये की, तो कॅटरिनाच्या परवानगी शिवाय तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी अशा सर्वासमोर मांडेल.”

तिच्या मैत्रिणीने सांगितले की, “कॅटरिना तिच्या रिलेशनबाबत खूप सावधान आहे. जेव्हा ती रणबीर कपूरसोबत रिलेशनमध्ये होती, तेव्हा त्याचे नाते सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावेळी तिला अनेक गोष्टीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आयुष्यात पुन्हा या गोष्टी घडाव्यात असे तिला वाटत नाही. त्यामुळे ती विकी सोबतचे नाते जेवढे गुप्त ठेवू शकते तेवढे ठेवायचे आहे.”

हर्षवर्धनने चॅट शोमध्ये त्यांच्या नात्याचा खुलासा केला होता. त्याने सांगितले होते की, कॅटरिना आणि विकी खरंच रिलेशनमध्ये आहेत. परंतु जेव्हा त्याची चूक त्याच्या लक्षात आली, तेव्हा तो म्हणाला होता की, यासाठी मी कोणत्या तरी अडचणीत येणार आहे का? आणि झालंही तसंच. आता कॅटरिना त्याच्यावर नाराज झाली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हॉलिवूडचा सुपरस्टारही आहे शाहरुख खानचा जबरा फॅन; ‘किंग खान’ची प्रशंसा करताच त्यानेही दिली प्रतिक्रिया

-‘पावसाळ्या संध्याकाळी होणारे काही मूड…’, म्हणत भजी खाण्यापूर्वी शेतात फिरताना दिसतोय सुव्रत जोशी

-जेव्हा कृष्णा अभिषेकने घेतले होते अनिल कपूरचे रूप; पाहून लोटपोट झाली होती सोनम कपूर

-‘तूच माझ्या जगण्याचा आधार’, सपना चौधरीच्या सुंदर व्हिडिओवर चाहत्याची प्रेमळ कमेंट


Leave A Reply

Your email address will not be published.