Friday, April 19, 2024

दु:खद! दिग्गज अभिनेते अशोक कुमार यांच्या लेकीचे निधन, दीर्घ काळापासून होत्या आजारी

कलाविश्वातून एकापाठोपाठ एक धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. मंगळवारी (दि. 20 सप्टेंबर) दिग्गज अभिनेते अशोक कुमार यांची मुलगी भारती जाफरी यांचे निधन झाले. भारती दीर्घ काळापासून आजारी होत्या. याच दिवशी त्यांच्यावर मुंबईच्या चेंबूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. भारती यांचे जावई आणि अभिनेते कंवलजीत सिंग यांनी याची पुष्टी केली.

भारती जाफरी (Bharti Jaffrey) यांची मुलगी अनुराधा पटेल हिच्याशी संसार थाटणाऱ्या कंवलजीत सिंग (Kanwaljit Singh) यांनी सोशल मीडिया पोस्ट करत सांगितले की, भारती यांचे मंगळवारी निधन झाले आहे. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, “आमच्या प्रेमळ भारती जाफरी, मुलगी, बहीण, पत्नी, आई, आजी, काकी, शेजारी, मैत्रीण आणि प्रेरणा आज 20 सप्टेंबरला आम्हाला सोडून गेली.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kanwaljit Singh (@kanwaljit19)

भारती यांचे वडील अशोक कुमार हे भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते होते. त्यांचे निधन 10 डिसेंबर, 2001 रोजी झाले होते. मृत्यूवेळी त्यांचे वय 90 वर्षे होते.

भारती जाफरी यांच्या निधनामुळे नंदिता दु:खी
भारती निधनामुळे अभिनेत्री आणि दिग्दर्शिका नंदिता दास या दु:खात आहेत. नंदिता दास (Nandita Das) यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत भारती जाफरी (Bharti Jaffrey) यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी सांगितले की, त्या भारती यांची खूप आठवण काढणार आहेत. त्या म्हणाल्या, “भारती जाफरी हे एक जिवंत व्यक्तिमत्व होते. प्रत्येकजण तिची आठवण काढेल. माझ्या प्रत्येक वाढदिवसाला ती मला विश करायची. मला तिची खूप आठवण येईल. ती खूप प्रतिभावान अभिनेत्री होती.”

नंदिता दासच नाहीत, तर भारती जाफरी यांच्या निधनामुळे बॉलिवूडवरही शोककळा पसरली आहे. कलाकारांनी डोळ्यात पाणी घेत भारतींना श्रद्धांजली वाहिली. विशेष म्हणजे, त्यांच्या निधनाच्या एक दिवसानंतर म्हणजेच बुधवारी (दि. 21 सप्टेंबर) कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘दुःखी लोकांना हसण्याची दैवी देणगी देणाऱ्या सिकंदरला अखेरचा सलाम’, राजूंच्या निधनावर दिग्गज कवी भावूक
मोठी बातमी! स्वातंत्र्यसैनिकाच्या बायोपिकमधून मांजरेकर बाहेर, दिग्दर्शन न करण्यामागील कारण आले समोर
राजूंच्या निधनानंतर पूर्ण खचून गेलीये पत्नी; म्हणाली, ‘मी बोलण्याच्या स्थितीत नाही, एवढंच सांगते…’

हे देखील वाचा