अभिनेत्री मधुबाला यांच्यावर चित्रपट काढाल तर तुरूंगात जाल, पाहा कोणी दिला इशारा

ज्येष्ठ अभिनेत्री मधुबाला (Madhubala) यांच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. अलीकडेच दिवंगत अभिनेत्री मधुबाला यांची बहीण मधुर ब्रिज भूषण हिने तिचा बायोपिक बनवण्याची घोषणा केली. हे ऐकून चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. मधुर ब्रिजभूषण शक्तीमानच्या निर्मात्यांसोबत मिळून तिच्या बहिणीची कथा मोठ्या पडद्यावर सादर करणार आहेत. मधुबाला व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि ब्रूइंग थॉट्स प्रायव्हेट लिमिटेड या बायोपिकची संयुक्तपणे निर्मिती करत आहेत. याशिवाय इतर कोणत्याही चित्रपट निर्मात्याने परवानगीशिवाय दिवंगत अभिनेत्रीचा बायोपिक बनवला तर त्याला कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

नुकतेच अभिनेत्रीची बहीण मधुर ब्रिजभूषण यांनी या ज्येष्ठ अभिनेत्रीवर कोणतीही परवानगी न घेता चित्रपट बनवण्याच्या तयारीत असलेल्या निर्मात्यांना इशारा दिला आहे. मधुबाला यांच्या जीवनावर कुटुंबाच्या परवानगीशिवाय जो कोणी चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहे, त्यांनी कायदेशीर कारवाईसाठी तयार राहावे, असे मधुर ब्रिजभूषण यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. मधुबाला यांची बहीण म्हणाली की, मधुबालावरील कोणताही चित्रपट हा तिच्या कुटुंबाचा भावनिक आणि कायदेशीर हक्क आहे.

गेल्या महिन्यातच मधुबालाची बहीण तिचा बायोपिक बनवणार असल्याचे समोर आले होते आणि त्यासाठी तिने शक्तीमानच्या निर्मात्यांशी हातमिळवणी केली आहे. रिपोर्ट्सनुसार त्यांनी या प्रोजेक्टवर सही केली आहे. अलीकडेच, अभिनेत्रीच्या बहिणीने देखील खुलासा केला आहे की मधुबालाच्या जीवनावर आधारित अनधिकृत पुस्तके प्रकाशित केल्याबद्दल तिचे सहकारी आधीच काही प्रकाशक आणि चित्रपट निर्मात्यांवर कायदेशीर कारवाई करत आहेत.

माधुरी ब्रिजभूषण पुढे म्हणाल्या, ‘माझी विनंती आहे की, मधुबाला यांच्याकडून प्रेरणा घेऊन असा प्रकल्प कोणीही बनवू नये.’ त्या पुढे म्हणाल्या की जर लोकांनी माझ्या विनंतीकडे लक्ष दिले नाही तर माझ्याकडे कठोर कायदेशीर कारवाई करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. हे आमच्या कुटुंबाच्या हक्कांचे उल्लंघन आहे आणि आमचा भावनिक आणि मानसिक छळ देखील आहे. त्यामुळे आदेश न पाळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

हेही वाचा – बाबो! अभिनेत्यांपेक्षा जास्त आहे या गायकांचे मानधन, एका गाण्याची रक्कम ऐकून बसेल धक्का

फ्लॉप चित्रपटांचा फटका! अक्षय कुमार- टायगर श्रॉफच्या मानधनात ‘इतकी’ घट

टेलिव्हिजनवरील सोज्वळ अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल, बोल्डनेसने केले चाहत्यांना घायाळ

 

Latest Post