नताशा आणि हार्दिकच्या मुलाने स्विमिंग पूलमध्ये केली मस्ती; अशाप्रकारे लुटला सुट्ट्यांचा आनंद, पाहा फोटो

Natasha Stankovic And Hardik Pandya Son Agastya Enjoying Holiday Cute Photos And Video Viral Watch


बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नताशा स्टॅन्कोविक आणि भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या सध्या सुट्टीचा आनंद लुटत आहे. असे असले तरीही तो नेहमी आपले फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो. नुकतेच त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, यामध्ये त्याच्यासोबत पत्नी नताशा आणि मुलगा अगस्त्यही पोज देताना दिसत आहेत. त्याचबरोबर अगस्त्य स्विमिंग पूलमध्ये वडिलांसोबत एन्जॉय करताना दिसत आहे.

या फोटोमध्ये पंड्याचा मुलगा अगस्त्य पूलमध्ये मस्ती करताना आणि त्याच्यासोबत खेळताना दिसत आहे. हार्दिक पंड्याने आपले हे फोटो शेअर करत लिहिले की, “पूलसाठी खूपच कूल, माझा मुलगा खरंच एक वॉटर बेबी आहे.”

पहिल्या फोटोत पंड्या नताशा आणि अगस्त्य एकत्र पूलशेजारी पोज देताना दिसत आहेत, तर दुसऱ्या फोटोत पंड्या मुलगा अगस्त्यसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहे. या फोटोत अगस्तचे हावभाव खूपट गोड आहेत. याव्यतिरिक्त आपल्या व्हिडिओत पंड्या अगस्त्यसोबत खेळताना दिसत आहे.

नताशानेही तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून फोटो शेअर केले आहेत.

त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्यामुळे त्याच्या या पोस्टला आतापर्यंत १९ लाखांपेक्षाही अधिक वेळा लाईक करण्यात आले आहे.

नताशाने ‘सत्याग्रह’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ती ‘बिग बॉस ८’ आणि ‘नच बलिए’मधून चांगलीच चर्चेत आली. याव्यतिरिक्त नताशाने ‘डीजे वाले बाबू’ या गाण्यात बादशाहसोबत आपल्या डान्सने धमाल केली होती.

नताशा स्टॅन्कोविक आणि हार्दिक पंड्या या जोडप्याने मागील वर्षीच लग्न केले होते. मागील वर्षी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच त्याने आपल्या साखरपुड्याचीही घोषणा केली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

-नोरा फतेहीच्या ‘या’ गाण्याने लावली इंटरनेटवर आग; एकाच आठवड्यात पार केला ६ कोटी व्ह्यूजचा टप्पा, पाहा व्हिडिओ
-गावाकडच्या पोरानं आपल्या डान्सनं ‘धकधक गर्ल’ला लावले वेड; मग माधुरीनेही केली मोठी घोषणा
-बिग बींना जया बच्चन यांच्यासोबत जायचे होते लंडनला; वडील हरिवंशराय बच्चन यांना समजल्यावर म्हणाले होते, ‘आधी…’
-ए भावड्या जरा इकडं बघ! टोनी कक्करच्या ‘बूटी शेक’ गाण्यात झळकली ‘ही’ अभिनेत्री, व्हिडिओला मिळाले ९० लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज


Leave A Reply

Your email address will not be published.