नेहा धूपिया-अंगद बेदीच्या घरी होणार चिमुकल्या पाहुण्याचे आगमन; अभिनेत्रीने फोटो शेअर करून चाहत्यांला दिली आनंदाची बातमी


या दिवसात बॉलिवूडमध्ये आनंदच आनंद पसरलेला दिसत आहे. एकीकडे अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले आहेत. तर दुसरीकडे अनेक कलाकारांच्या घरी चिमुकल्या पावलांचे आगमन झाले आहे. असाच आनंद अंगद बेदी आणि नेहा धूपिया यांच्या घरी येणार आहे. नेहा दुसऱ्यांदा आई होणार आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ही आनंदाची बातमी प्रेक्षकांना दिली आहे. तिने शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे. (Neha Dhupia and Angad bedi expecting their socond child , give information on social media)

नेहाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फॅमिली फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिची मुलगी मेहर, ती आणि तिचा पती अंगद दिसत आहे. त्या तिघांनीही काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. अंगदने एका हाताने त्याच्या मुलीला उचलून घेतले आहे, तर नेहाच्या बेबी बंपवर दुसरा हात ठेवला आहे. तसेच नेहा आणि मेहर या दोघीही बेबी बंपकडे बघत आहेत.

हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “आम्हाला एक कॅप्शन शोधण्यासाठी दोन दिवस लागले आहेत. या सगळ्यात आम्ही जो चांगला विचार करू शकलो तो म्हणजे धन्यवाद देवा.”

तिच्या या पोस्टवर अनेक कलाकार तिचे अभिनंदन करत आहेत. रोहित रेड्डीपासून ते नव्या नंदापर्यंत सगळे तिला सोशल मीडियावर शुभेच्छा देत आहेत. तिचे चाहते ही बातमी ऐकून खूपच खुश झाले आहेत. नेहा धूपियाने २०१८ साली अंगद बेदीसोबत लग्न केले आहे. तिच्या लग्नाच्या बातमीने सगळेच हैराण झाले होते. यानंतर तिने सांगितले की, ती प्रेग्नेंट होती त्यामुळे त्यांनी घाईमध्ये लग्न केले होते. १० मे २०१८ रोजी त्यांची पहिली मुलगी मेहर हिचा जन्म झाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-रुबीना दिलैक मोठ्या पडद्यावर धमाल करण्यासाठी सज्ज; लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार टीव्हीची ‘किन्नर सून’

-फिल्म इंडस्ट्रीबाबत राजपाल यादवचा मोठा खुलासा; म्हणाला, ‘आर्थिक तंगी दरम्यान इंडस्ट्रीने मला…’

-बिग बींच्या ‘या’ अभिनेत्रीचा झाला होता दुर्दैवी अंत; लहानपणीच केली होती तिच्या आकस्मिक मृत्यूची भविष्यवाणी


Leave A Reply

Your email address will not be published.