लहान मुलांना चित्रपटगृहात जाण्यास येऊ शकते बंधन; केंद्र सरकारचा नवा कायदा जाहीर


आपल्या आयुष्यात मनोरंजनाला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यातील चित्रपट म्हणजे प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय. अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना चित्रपट पाहायला आवडतात. त्यात चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणे हे लहान मुलांसाठी खूप आनंदाची गोष्ट असते. पण आता लहान मुलांच्या याच आनंदाला विरजन लागू शकते.(New cenematography act : audience should show age certificate in theatre)

केंद्र सरकारने सिनेमेटोग्राफ विधेयकात काही दुरूस्ती केली आहे. यामध्ये लहान मुलांना चित्रपटगृहात चित्रपट बघण्यासाठी त्यांच्या वयाचा दाखला द्यावा लागणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आता निर्माते त्रस्त झाले आहेत. तसेच चित्रपटगृहाच्या मालकांनी देखील यावर आक्षेप व्यक्त केला आहे.

खरंतर कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्याआधी सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेटद्वारे मान्यता मिळावी लागते. सीबीएफसी तर्फे चित्रपटांना त्यांच्या दर्जानुसार ग्रेड दिल्या जातात. परंतु आता जुन्या पद्धतीत केंद्र सरकारने काही फेरबदल केले आहेत. सरकार आता सिनेमेटोग्राफ कायदा १९५२ मध्ये दुरुस्ती करणार आहे. या कायद्याला सिनेमेटोग्रॉफ कायदा २०२१ असे संबोधण्यात येणार आहे. या कायद्यात ६ दुरुस्त्या केल्या आहेत. त्यातील पहिली दुरुस्ती म्हणजे, सर्टिफिकेट मिळाल्यानंतर जर कोणी एखाद्या चित्रपटाबाबत विरोध दाखवला, तर चित्रपटाचं पुन्हा एकदा सीबीएफसी द्वारे समीक्षण केले जाईल. तसेच चित्रपटगृहात जाण्यापूर्वी प्रत्येकाला त्याच्या वयाचा दाखला दाखवणे बंधनकारक असणार आहे. कारण यापुढे प्रेक्षकांची तीन भागात वर्गवारी केली जाणार आहे. यामध्ये ७ वर्षाखालील, १३ वर्षाखालील आणि १८ वर्षाखालील प्रेक्षक असे विभाजन केले जाणार आहे.

केंद्र सरकारने केलेल्या या नव्या दुरुस्तीमुळे चित्रपट निर्माते खूप नाराज झाले आहेत. कारण यामुळे कोट्यवधीचे नुकसान होऊ शकते. कारण शेवटच्या क्षणी जर एखाद्या कलाकाराला, गाण्याला किंवा एखादा डायलॉग काढण्यास सांगितले तर ते शक्य होणार नाही. तसेच थिएटर मालकांनी देखील सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. अशा प्रकारे जर बंधन घातली, तर प्रेक्षक थिएटर ऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट पाहण्यास पसंती दर्शवतील अशी भीती व्यक्त केली जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कृष्णा श्रॉफचे म्युझिक व्हिडिओमधून दमदार पदार्पण; तिच्या अदा पाहून स्वत: ला रोखू शकली नाही दिशा पटानी आणि…

-‘तु किती वेळा सिगारेट घेतेस?’ युजरच्या या प्रश्नावर ‘नॅशनल क्रश’ रश्मिकाने ‘अशी’ दिली प्रतिक्रिया

-सामान्य मुलीपासून लोकप्रिय चेहरा बनली शर्ली सेतिया; केवळ गायकीचेच नव्हे, तर तिच्या लुक्सचेही आहेत लाखो दिवाने


Leave A Reply

Your email address will not be published.