ऍसिड अटॅकनंतर मोडले होते कंगना रणौतच्या बहिणीचे लग्न; अभिनेत्री म्हणाली, ‘तो कधीच परत आला नाही’


‘जागतिक योग दिन’ हा 21 जून रोजी साजरा केला जातो. आज हा खास दिवस आहे. अनेक बॉलिवूड कलाकार देखील यानिमित्त आपले योगा करतानाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत सोशल मीडियावर शुभेच्छा देत आहेत. याच दिवशी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिने तिची बहिण रंगोली चंदेल हिचा फोटो शेअर केला आहे. तिने तिच्या बहिणीचा फोटो शेअर करून हे सांगितले आहे की, योगा आपल्या आयुष्यासाठी किती महत्वाचा आहे. (On international yoga day kangana Ranaut share her sister’s story on social media)

तिने लिहिले की, कोणताही आजार असला, तरीही योगा हा प्रत्येक आजारावरचे औषध आहे. या आधी कंगनाने तिचे आई वडील, भाऊ अक्षत आणि वहिनी ऋतू यांचा योगा करताना फोटो शेअर केला होता.

कंगनाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या बहिणीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करून तिने लिहिले की, “रंगोलीची योगा कहाणी एक प्रेरणादायी आहे. एका मजनूने तिच्यावर ऍसिड हल्ला केला होता, तेव्हा ती नीट 21 वर्षाची देखील नव्हती. हा हल्ला खूप खतरनाक होता. तिचा अर्धा चेहरा जळला होता. एका डोळ्याची दृष्टी गेली होती. कान आणि ब्रेस्ट देखील गंभीर पद्धतीने जळले होते. तिची 2-3 वर्षात जवळपास 54‌ सर्जरी झाल्या आहेत. पण तेव्हा ते देखील पुरेसे नव्हते.”

कंगनाने पुढे लिहिले की, “सर्वात जास्त चिंता मला तिच्या मानसिकतेची होती. कारण त्या वेळेस ती एकही शब्द बोलत नव्हती. त्यावेळी रंगोली एका एअरफोर्स ऑफिसरसोबत रिलेशनमध्ये होती, पण ऍसिड हल्ल्यानंतर जेव्हा त्याने तिचा चेहरा पाहिला त्यानंतर तो परत कधीच तिच्याकडे आला नाही. तेव्हाही तिच्या डोळ्यातून एक अश्रू देखील निघाला नाही. तिने तोंडातून एक शब्द देखील काढला नाही.”

कंगनाने पुढे सांगितले की, “मला फक्त एवढंच वाटत होत की, तिने लवकरात लवकर माझ्याशी बोलावं, त्यामुळे मी तिला अनेक ठिकाणी घेऊन जात होते. अगदी माझ्यासोबत योगा क्लासला देखील मी तिला घेऊन जात होते. तिने माझ्यासोबत योगा करायला सुरुवात केली. त्यानंतर मी तिच्यात कमालीचा बदल पाहिला. ती केवळ प्रतिसाद द्यायला लागली नाही, तर तिच्या एका डोळ्याची दृष्टी देखील हळूहळू परत यायला लागली होती. योगा हे प्रत्येक आजाराचे औषध आहे.”

कंगना रणौत ही बॉलिवूड अभिनेत्री खूप चर्चेत असते. अनेक गोष्टींवर ती तिचे मत मांडत असते. त्यामुळे अनेकवेळा तिला ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कपिल शर्माच्या शोमध्ये भोजपुरीच्या सुूपरस्टार्सची धमाल; तर कपिल शर्माचीही बोलती झाली बंद

-‘ही’ गोष्ट अधिक प्रिय असल्यामुळे, बॉलिवुड पार्ट्यांमध्ये जाणे टाळतो अक्षय कुमार; अभिनेत्याने स्वत: केला होता खुलासा

-मीडियम शॉर्ट हेअरमध्ये बरीच सुंदर दिसतेय ऋता; नवीन हेअरकट फ्लाँट करताना दिसली अभिनेत्री


Leave A Reply

Your email address will not be published.