क्रूर खलनायिका! अनेक मुलींना ज्यांच्या भूमिकांत आपल्या सासू दिसतात, ‘त्या’ बॉलीवूडमधील पहिल्या खलनायिकेचा प्रवास


मनोरमा भारतीय सिनेष्टीतील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री. त्यांनी त्यांच्या खलनायकी आणि विनोदी भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या मनात त्यांचे स्थान अढळ केले. कधी त्यांनी त्यांच्या भूमिकेमुळे रसिकांना खळखळून हसवले, तर कधी त्यांनी त्यांच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांना चीड देखील आणली. अनेक सिनेमांमध्ये त्यांनी त्यांच्या भूमिकांनी त्या चित्रपटांना एक वेगळी ओळख प्राप्त करून दिली. त्यात सीता और गीता, एक फूल दो माली, दो कलियां, कारवाँ अशा काही सिनेमांचा समावेश आहे. या हरहुन्नरी अभिनेत्रीने १५ फेब्रुवारी २००८ साली या जगाचा निरोप घेतला. आज त्यांची १३ वी पुण्यतिथी.

गोरा रंग, मोठे डोळे, दमदार आणि जड आवाज ही त्यांची अजून एक ओळख. १९७२ साली आलेल्या ‘सीता और गीता’ या सिनेमात त्यांनी साकारलेली कौशल्या काकू आजही लोकांच्या मनात कायमच घर करुन गेली. मनोरमा यांनी त्यांच्या करियरमध्ये बहुतकरून खलनायिका आणि विनोदी भूमिका निभावल्या. पुढे ह्याच भूमिका त्यांची ओळख बनल्या. २००५ साली दीप मेहता यांच्या ‘वॉटर’ या सिनेमात त्यांनी विधवा आश्रमाच्या मुख्य अध्यक्षाची भूमिका निभावली. हाच सिनेमा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला.

मनोरमा यांनी बालकलाकार म्हणून लाहोर येथे काम करायला सुरुवात केली. त्यांनी राजन हक्सर यांच्यासोबत लग्न केले. मात्र भारत पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर त्यांनी भारतात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. मनोरमा अभिनेत्री झाल्या, तर राजन निर्माते झाले. त्यांचे खरे नाव मनोरमा नव्हते. परंतू १९४१ साली आलेल्या खाजनची सिनेमात त्यांनी साकारलेली मनोरमा भूमिका खूप लोकप्रिय झाली. म्हणून त्यांनी हेच नाव लावायला सुरुवात केली.

चित्रपटातील क्रूर काकी, सावत्र आई अशा भूमिकांमधून त्यानी प्रेक्षकांच्या ह्रदयात एका खलनायक महिलेची जागा निर्माण केली होती.परंतू याच मनोरमा यांनी प्रेक्षकांना तितकेच हसवले देखील. सीता और गीतामधील कौशल्या काकूंची बरोबरी कोणीच करू शकले नाही. या भूमिकेनंतर प्रेक्षक त्यांना खूप ओरडायचे, त्यांच्यावर चिडायचे.

मनोरमा यांनी १५० पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केले, २००८ साली दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-
हॅप्पी बर्थडे ब्रह्मी! हजारांहून अधिक चित्रपटात अभिनय, कोट्यवधींची संपत्ती; वाचा काॅमेडीच्या महानायकाबाबत
असं म्हणतात बरं आजोबा व्हायच्या वयात हे स्टार झाले डॅडी! पाहा त्या महान कलाकारांची यादी
इन्कलाब ते  द अमिताभ बच्चन  बनण्याची कहानी, वाचा महानायक बच्चनचा थक्क करणारा प्रवास
कुणी बस कंडक्टर, कुणी सेल्समन तर कुणी होतं आचारी या दिग्गज कलाकारांची  संघर्ष गाथा एकदा वाचाच


Leave A Reply

Your email address will not be published.