सैराटनंतर आर्चीमध्ये झालेला ‘हा’ नवा बदल नक्कीच कौतुकास्पद, पाहा रिंकूचे नवीन ग्लॅमरस फोटो


प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ सिनेमाने मराठी चित्रपटसृष्टीला अनेक चांगले दमदार कलाकार दिले. याच सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले रिंकू राजगुरू या अभिनेत्रीने आणि बघता बघता ती संपूर्ण महाराष्ट्रातला त्यांच्या घरातलीच वाटू वागली. २०१६ साली आलेल्या सैराट सिनेमात गावातली साधी तरीही बोल्ड दिसणारी रिंकू या सिनेमानंतर हळूहळू बदलू लागली. आज सैराट चित्रपटाच्या ४ वर्षानंतर रिंकूमध्ये मोठा बदल झाला आहे. सैराट सिनेमानंतर रिंकूला आता पहिले, तर तिचा मोठा मेकओव्हर झाला आहे. ती अतिशय कॉन्फिडन्ट, स्टायलिश आणि फॅशनेबल झाली आहे.

रिंकूच्या इंस्टाग्रामवर चक्कर मारली तर आपल्याला रिंकूमध्ये झालेला मोठा बदल नक्कीच जाणवेल. रिंकूने तिचे वजन खूप कमी केले आहे. त्यामुळे ती अतिशय फिट आणि अधिक सुंदर दिसत आहे. शिवाय तिचा ड्रेसिंग सेन्स देखील खूपच बदलला आहे.

सुरुवातीला सलवार सूट, लेगीन कुर्तामध्ये दिसणारी रिंकू आता चक्क शॉर्ट ड्रेस, जिन्स घालताना दिसत आहे. तिच्यात झालेला हा बदल नक्कीच कौतुकास्पद आहे.

मराठीसोबतच हिंदीमध्ये देखील काम करणारी रिंकू प्रचंड कॉन्फिडन्ट झाली आहे. तिचा अंदाज आणि ग्लॅमरस लूक नक्कीच प्रेक्षकांना आवडत आहे. सध्या रिंकू तिचे अनेक सुंदर फोटो सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत आहे. ते पाहून तिचे फॅन्स खूपच खुश आहे, आणि अनेकांसाठी ती आता प्रेरणा ठरत आहे. या क्षेत्रात काम करत असूनही ती अभ्यासही तितक्याच जोमाने करते.

रिंकूच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर ती लवकरच प्रार्थना बेहरे, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना यांच्यासोबत समीर जोशींच्या ‘छूमंतर’ सिनेमात दिसणार आहे.

तिने या सिनेमाचे लंडनमध्ये शूटिंग पूर्ण केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

डायरेक्टरने प्रियांका चोप्राला दिला होता सर्जरी करून फिगर ठीक करण्याचा सल्ला; अभिनेत्रीने आपल्या पुस्तकात केला धक्कादायक खुलासा

वाढदिवस विशेष! इंजिनियरिंगचे शिक्षण सोडून कुमार विश्वास बनले ‘कवी’, ‘चाय गरम’ चित्रपटात केला होता अभिनय

सुंदरता असावी तर अशी! जब्याच्या शालूने शेअर केले भन्नाट फोटो, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात


Leave A Reply

Your email address will not be published.