‘भाईजान’च्या ‘जीने के हैं चार दिन’ गाण्यातील टॉवेलचा लिलाव; छोट्याशा टॉवेलला मिळाले ‘इतके’ लाख

बॉलिवूडचा ‘भाईजान’ म्हणजेच सलमान खानचा चाहतावर्ग फक्त भारतात नसून संपूर्ण जगभरात आहे. तो जिथे जातो, तिथे त्याला पाहण्यासाठी चाहत्यांची तुडुंब गर्दी असते. अलीकडेच, तो रशियामध्ये त्याचा आगामी चित्रपट ‘टायगर ३’ चे शूटिंग करत आहे. याच दरम्यान असेच काहीसे पाहायला मिळाले आहे. तिथेही सलमानचे चाहते त्याच्याभोवती उभे होते आणि त्यांना त्याच्यासोबत सेल्फी घ्यायची होती. अशीच काहीशी लोकप्रियता त्याच्या वापरलेल्या ब्रँड आणि उत्पादनांमुळे देखील आहे. याच संदर्भात आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

सलमानने एका चित्रपटात वापरलेल्या टॉवेलचा नुकताच लिलाव झाला आहे. त्याचा २००४ मध्ये ‘मुझसे शादी करोगी’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटात त्याने एक टॉवेल वापरला होता. आपल्या सर्वांना ‘जीने के हैं चार दिन’ हे गाणे आठवत असेलच. या गाण्यात सलमान खानने हा टॉवेल वापरला होता. अनेक वर्षांनंतर या टॉवेलचा आज लिलाव झाला. या टॉवेलचा लिलाव किती रुपयाला झाला? हे समजल्यावर तुम्हाला धक्काच बसेल.

माध्यमांतील वृत्तानुसार, सलमानच्या ‘जीने के है चार दिन’ या गाण्यातील टॉवेलचा १ लाख ४२ हजार रुपयांना लिलाव झाला आहे. सलमानबद्दल संपूर्ण जगात लोकांमध्ये खूप मोठी क्रेझ आहे. याच लोकांनी एका छोट्य़ा टॉवेलला लाखो किमतीचे बनवले.

सलमानचा ‘मुझसे शादी करोगी’ हा चित्रपट डेव्हिड धवन यांनी दिग्दर्शित केला होता. यात त्याच्यासोबत प्रियांका चोप्रा आणि अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात दिवंगत अमरीश पुरी आणि कादर खान यांच्याही भूमिका होत्या. याशिवाय सतीश शाह आणि राजपाल यादव देखील चित्रपटात कॉमिक भूमिकेत होते. राजपाल यादवची या चित्रपटात दुहेरी भूमिका होती. हा चित्रपट त्या वर्षीच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक होता.

सलमानच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तो शेवटचा ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटात दिसला होता. तो सध्या ‘टायगर ३’ चे शूटिंग करत आहे. रशियानंतर तो आता या चित्रपटाचे चित्रीकरण तुर्कीमध्ये करणार आहे. या चित्रपटाची अभिनेत्री कॅटरीना कैफ असणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जाळ अन् धूर संगटच! राखी सावंतने ‘कमरिया लचके रे’ गाण्यावर लावले ठुमके; व्हिडिओ जोरदार व्हायरल

-‘पवित्र रिश्ता २.०’चा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला; चाहते म्हणाले, ‘सुशांतशिवाय सर्वकाही अपूर्ण’

-सई ताम्हणकरचा समुद्रात जलवा; चाहते तर सोडाच, कलाकारांनीही पाडला कमेंट्सचा पाऊस

Latest Post