वडील सैफ अली खान ५० व्या वर्षी चौथ्यांदा झाला बाबा; तर मुलगी साराने म्हटले, ‘बाबा, तुम्ही खूपच…’


‘कितने अजीब रिश्ते है यहा पे’ या गाण्याच्या ओळी बॉलिवूडमधील नात्यांना योग्य पद्धतीने स्पष्ट करून सांगतात. इथे रोज नाते तुटतात आणि रोज नवीन नाती जोडली जातात. नात्यांना अगदी सहज बदलून नव्या रूपात ती सर्वांसमोर ठेवली जातात. आता बॉलिवूडचा नवाब असलेल्या सैफ अली खानचेच बघा. आपल्यापेक्षा मोठ्या अमृता सिंगसोबत लग्न केल्यांनतर काही वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला होता. सैफला या लग्नापासून सारा अली खान आणि इब्राहिम खान अशी दोन मुलं झाली. पुढे सैफने करीना कपूरसोबत लग्न केले. या दोघांना दोन मुलं झाली. सैफ आणि अमृताची मुलगी असलेल्या साराने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असून, ती आज एक यशस्वी अभिनेत्री आहे. सारा आणि सैफ यांच्यामध्ये चांगले बाँडिंग असल्याचे पाहायला मिळते. बऱ्याच वेळा चित्रीकरणातून वेळ काढून सारा सैफला भेटायला जाते. फेब्रुवारीमध्ये करीना दुसऱ्यांदा आई झाल्यावर सुद्धा सारा करीनाला आणि नव्या बाळाला भेटायला गेली होती.

माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत साराने छोट्या भावाला भेटून कसा अनुभव आला ते सांगितले आहे. ती म्हणाली, “त्याने माझ्याकडे पाहिले आणि तो हसला. मला ते पाहून आनंद झाला. तो खूपच क्यूट आहे.”

सैफ अली खान ५०व्या वर्षी चौथ्यांदा बाबा झाला. यावर सारा त्याला मजेमध्ये म्हणते, “बाबा तुम्ही खूप नशीबवान आहात. आयुष्यातील प्रत्येक दशकात तुम्हाला मुले झाले आहे. २०, ३०, ४० आणि ५० या चारही दशकात त्यांना मुलं झाली आहे. आताचे हे बाळ त्यांच्या आयुष्यात आनंद घेऊन आले आहे आणि मी त्यांच्यासाठी खूप खूश आहे.”

सारासाठी तिचे कुटुंब सर्वात महत्त्वाचे आहे. ती चित्रपटांच्या शूटिंगमधून वेळ काढत आपल्या परिवारासोबत नेहमी दिसत असते. सारा तिच्या आईच्या अमृता सिंगच्या सर्वात जवळ आहे, तर तिच्या लहान भावासाठी इब्राहिमसाठी ती खूप प्रोटेक्टिव्ह आहे.

साराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले, तर ती लवकरच ‘अतरंगी रे’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अक्षय कुमार आणि धनुष मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-एका मिनिटात तुम्ही किती पुश अप्स मारु शकता? वापरा मिलिंद सोमणने सांगितलेला सोप्पा फॉर्म्युला

-शिल्पी राजच्या नवीन गाण्याने यूट्यूबवर घातलाय राडा, एका दिवसातच मिळाले ‘इतके’ व्ह्यूज

-यूट्यूबवर रेकॉर्ड करण्यासाठी भोजपुरी सुपरस्टारचे नवे गाणे सज्ज, ‘चुम्मा देहब ठोरवा में’ गाणे प्रदर्शित


Leave A Reply

Your email address will not be published.