‘कुछ चीज़े हम पुरानी छोड़ आये हैं’, म्हणत अभिनेत्री श्रुती मराठेने शेअर केले फोटो, पाहा ग्लॅमरस अंदाज

Shruti Marathe Glam Up On Social Media With Love In Saree


मराठी चित्रपटसृष्टीत बऱ्याच अभिनेत्री अशा आहेत, ज्यांना सोशल मीडियावर सक्रिय राहायला खूप आवडतं. त्या आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींबद्दल सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. तसेच नवनवीन फोटो, व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असतात. यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे ‘श्रुती मराठे’. श्रुती आपल्या फोटोंमुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. मग तो फोटो ढोल वाजवतानाचा असो किंवा मग साडीतील, ती आपल्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. तिने नुकतेच आपले फोटोशूट केले. यादरम्यानचे तिचे फोटो जबरदस्त व्हायरल होत आहेत.

श्रृतीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. तिचे हे फोटो पाहून चाहत्यांसह सेलिब्रिटींनीही लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

तिने शेअर केलेल्या एका फोटोत ती आकाशी रंगाच्या ड्रेसमध्ये बसलेली दिसत आहे. यामध्ये तिने कानात मोठी इअरिंग घातली आहे. तसेच तिने आपले केसही मोकळे सोडले आहेत. तिच्या या अंदाजाने चाहत्यांना भूरळ घातली आहे. या फोटोला कॅप्शन देत तिने ‘माझे डोळे एक कथा सांगतात, आपल्याला फक्त ती कशी वाचायची ते शिकले पाहिजे,’ असे लिहिले आहे.

तिने आपल्या ब्लॅक एँड व्हाईट फोटोही शेअर केला आहे. यामध्ये ती समोर पाहताना दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘आपले बाह्य सौंदर्य डोळे टिपतील, परंतु आपले आतील सौंदर्य हे हृदय टिपेल,’ असे लिहिले आहे.

तिच्या या फोटोवर चाहत्यांनी हार्ट इमोजी शेअर केले आहेत.

याव्यतिरिक्त तिने आणखी एक फोटो शेअर केलाय. यामध्ये ती पांढऱ्या आणि लाल रंगाच्या साडीत दिसत आहे. यात तिने कपाळावर छान अशी लाल टिकली आणि हलकीशी लिपस्टिकही लावलेली दिसत आहे.

तिने या फोटोला, ‘कुछ चीज़े हम पुरानी छोड़ आये हैं, आते आते उसकी आँखों में पानी छोड़ आये हैं, ये ऐसा दर्द है जो  बयां हो ही नहीं सकता, दिल तो साथ ले आये धड़कन छोड़ आये है।’ अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे.

याव्यतिरिक्त तिचा जबरदस्त लूकही चाहत्यांना पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवादरम्यान ती ढोल वाजवतानाही दिसली होती. यादरम्यानचाही फोटो तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता.

श्रुतीचा जन्म ९ ऑक्टोबर, १९८६ रोजी वडोदरा येथे झाला होता. तिने सन २००८ साली ‘सनई चौघडे’ या चित्रपटातून अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली होती. यानंतर तिने ‘तिचा बाप त्याचा बाप’, ‘प्रेमसूत्र’, ‘रमा माधव’, ‘मुंबई-पुणे- मुंबई २’, ‘बंध नायलॉनचे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. तिने मराठीव्यतिरिक्त तमिळ चित्रपटातही काम केले आहे. त्यामध्ये ‘नान अवानिल्लाई २’, ‘आरवां’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बिकीनीत फोटो पाहायचे असेल तर केवळ मौनी रॉयचेच! पाहा मौनीच्या घायाळ करणाऱ्या अदा

-क्या बात! नोरा फतेही बरोबर थिरकले चिमुकलीचे पाय, ‘दिलबर’ गाण्यावर केला अफलातून डान्स

-‘मिल्की’ गाण्यावर सपना चौधरीने लावले ठुमके! गाण्यातील अदा पाहून चाहतेही झाले दंग


Leave A Reply

Your email address will not be published.