‘नदिया कें पार’ फेम अभिनेत्री सविता बजाज आयसीयूमध्ये दाखल; ‘देवदूत’ बनलेला सोनू सूद पुन्हा आला मदतीला धावून


‘नदिया कें पार’ या चित्रपटातील अभिनेत्री सविता बजाज या दिवसात अनेक कठीण प्रसंगातून जात आहेत. सविता बजाज यांची तब्येत खूप खराब झाली आहे. त्या हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये आहेत. अभिनेत्री नुपूर अलंकार यांनी या गोष्टीचा खुलासा केला. अशातच कोरोना काळात संपूर्ण देशासाठी देवदूत बनलेला सोनू सूद सविता यांची मदत करण्यासाठी धावला आहे.

सोनू सूदने सांगितले की, त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्याला मेसेज करून त्यांच्या तब्येतीबाबत विचारपुस केली आहे. त्याने सांगितले की, “ऑक्सिजन मशीन हॉस्पिटलमध्ये पोहचली आहे. मी त्यांना व्हिडिओ देखील बनवायला सांगितला आहे. मशीन त्यांच्याकडे सुरक्षित पोहचलेली आहे. आता त्या लवकरात लवकर बऱ्या होतील एवढीच प्रार्थना करा.” सोनू सूदचे चाहते त्याच्या या कामाबाबत त्याचे खूप कौतुक करत आहेत.

काही दिवसांपूर्वी सविता बजाज यांनी सांगितले होते की, त्यांना आजारासोबतच आर्थिक तंगीचा देखील सामना करावा लागला होता. पैशांच्या कमतरतेमुळे त्यांना अनाथ आश्रमात देखील जागा मिळत नव्हती. अभिनेत्री नुपूर अलंकार यांनी आजतकसोबत बोलताना सांगितले की, “सविता बजाज यांची तब्येत आता सुधारत आहे. त्यात आयसीयूमध्ये आहेत.” (Sonu Sood sent oxygen machines to actress savita Bajaj)

नुकतेच काही दिवसांपूर्वी सविता बजाज यांनी सांगितले होते की, रायटर्स असोसिएशन आणि CINTAA तर्फे मदत मिळत आहे. त्यातूनच त्या दिवस घालवत आहेत. त्यांनी सांगितले होते की, रायटर्स असोसिएशनकडून दोन हजार आणि CINTAA तर्फे पाच हजाराची मदत मिळाली आहे. यातूनच त्या घर चालवत होत्या.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कार्तिक आर्यनच्या नव्या चित्रपटाची घोषणा; आता पायलट बनून अभिनेता जिंकणार रसिकांची मनं

-राज कुंद्रा प्रकरणात शिल्पा शेट्टीचा ‘हंगामा २’ झाला प्रदर्शित; चित्रपटावर होणार परिणाम?

-आर्ची अन् परश्या आगामी प्रोजेक्टमध्ये दिसणार एकत्र?? फोटो पाहून नेटकऱ्यांमध्ये रंगलीय एकच चर्चा


Leave A Reply

Your email address will not be published.