सध्या चित्रपटसृष्टीत ट्रेलर, टिझर, पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्याचा जणू काही ट्रेंडच सुरू झाला आहे. सेलिब्रिटी आपल्या नवीन चित्रपटाचे एका पाठोपाठ एक असे ट्रेलर, टिझर, पोस्टर शेअर करत आहेत. यामध्ये आता सुपरस्टार रजनीकांत यांचा जावई आणि अभिनेता धनुषचाही समावेश आहे. त्याने नुकताच एका चित्रपटाचा ट्रेलर आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.
खरं तर दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांत आणि अभिनेत्री राय लक्ष्मी यांच्या ‘मिरुगा’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर अभिनेता धनुषने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. हा ट्रेलर शेअर करत अभिनेता श्रीकांतला टॅग करत त्याने लिहिले की, “माझा प्रिय मित्र अभिनेता श्रीकांतच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ शेअर करत खूप आनंद होत आहे. #MirugaaTrailer…”
Happy to release my good friend @Act_Srikanth #MirugaaTrailer : https://t.co/chiDblPJuu#GarjanaTrailer : https://t.co/lniOMJBROF
— Dhanush (@dhanushkraja) February 28, 2021
धनुषसोबतच अभिनेता विजय एँटनीनेही या चित्रपटाचा ट्रेलर आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे.
Hi????Happy to share Indias First Time Highest Screen time of a Tiger#MirugaaTrailer : https://t.co/Yi83VlfLwL#GarjanaTrailer : https://t.co/NtCYOUSpvV@ijaguarstudios @iamvinodjain @Act_Srikanth @iamlakshmirai @ArulDevofficial @mv_panneer @nareshjain2682 @divomovies @onlynikil
— vijayantony (@vijayantony) February 28, 2021
या ट्रेलरवरूनच चित्रपटाच्या स्टोरीचा अंदाज लावला जाऊ शकतो. असे वाटत आहे की, राय लक्ष्मी एका घरात वाघासोबत अडकली आहे आणि श्रीकांत वाघापासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. तरीही, श्रीकांतची भूमिकाही संशयाच्या घेऱ्यात दिसत आहे. चित्रपटासाठीचा सेट जंगलात बनवला गेला आहे, ज्यामध्ये एका वाघाची महत्त्वाची भूमिका आहे. ‘मिरुगा’ चित्रपट हा भारतातील पहिला चित्रपट आहे, ज्यामध्ये एका वाघाला सर्वाधिक स्क्रीन टाईम देण्यात आला आहे.
अभिनेता श्रीकांतने काही दिवसांपूर्वी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर सांगितले होते की, धनुष आणि आर्यसोबतच त्याचे अनेक मित्र ‘मिरुगा’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ करतील. चित्रपट तेलुगु भाषेतही रिलीझ केला जाणार आहे, ज्याचे नाव ‘गर्जना’ असे आहे.
श्रीकांत आणि राय लक्ष्मी यापूर्वीही एका चित्रपटात दिसले होते. त्या चित्रपटाचे नाव ‘सोवरपेट्टई’ असे होते.
या चित्रपटाचे दिग्दर्शन जे पार्थिबन यांनी केले आहे, तर चित्रपटाला म्युझिक हे अरुलदेव यांनी दिले आहे. चित्रपटाची स्टोरी आणि स्क्रीनप्ले एमवी पन्नीरसेल्वम यांनी लिहिली आहे. त्यांनीच सिनेमॅटोग्राफीदेखील केली आहे. टेक्लिनकल टीममधून चित्रपटाची एडिटिंग ही आर सुदर्शन यांनी केली आहे.
‘मिरुगा’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी म्हणजेच ५ मार्च रोजी रिलीझ होत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये श्रीकांत आणि राय लक्ष्मी दिसत आहेत. याव्यतिरिक्त ‘मिरुगा’ चित्रपटामध्ये देव गिल, नायरा, वैष्णवी, आरोही, काले पंडी यांचाही समावेश आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-