×

बाबासाहेब पुरंदरेंच्या लिखाणाचे कथन करताना दिसली स्पृहा जोशी, समोर आला शिवजन्मोत्स्वाचा इतिहास सांगणारा व्हिडिओ

अभिनेत्री स्पृहा जोशी (Spruha Joshi) चित्रपटसृष्टीतल्या प्रतिभावान कलाकारांपैकी एक आहे. तिने अनेक चित्रपटात उत्तम कामगिरी करत, रसिकांची मने जिंकली आहेत. अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. याठिकाणी वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

बऱ्याचदा ती तिच्या लिखाणामुळे चर्चेत येत असते. आतापर्यंत तुम्हाला समजलं असेलच की, स्पृहाला अभिनयासोबत कविता लिहण्याची आणि सादर करण्याची देखील आवड आहे. अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची ही कला बऱ्याचदा चाहत्यांसमोर सादर करताना दिसते. स्पृहा तिच्या कवितेमुळे अनेकदा चर्चेत येत असते.

अभिनेत्रीने तिचे एक यूट्यूब चॅनल सुरु केले आहे, ज्याच्या माध्यमातून ती चाहत्यांचे मनोरंजन तर करतेच, सोबतच त्यांना अनेक गोष्टींसाठी प्रोत्साहित करते, जागरूक करते. ती तिच्या चॅनेलवर कविता वाचन, आवडलेल्या पुस्तकाबद्दल माहिती आदी अनेक गोष्टी करते. स्पृहाच्या या सर्व व्हिडिओंना चांगलाच प्रतिसाद देखील मिळतो.

शिवजयंतीच्या निमित्ताने स्पृहा पुन्हा एकदा चाहत्यांसाठी एक खास व्हिडिओ घेऊन आली आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने शिवजन्मोत्सवाचा सोहळा अतिशय उत्कृष्टरित्या कथन केला आहे.

स्पृहा काय म्हटलीय व्हिडिओमध्ये?
या व्हिडिओमध्ये सुरुवातीला स्पृहा महान इतिहासकर बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दल बोलताना दिसत आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी ‘राजा शिवछत्रपती’ नावाचे पुस्तक लिहिले होते. या व्हिडिओमध्ये स्पृहा त्यांच्या या पुस्तकातील एका प्रकरणाच्या सारांशाचे कथन करताना दिसत आहे.

या प्रकरणामध्ये शिवाजी महाराजांच्या जन्माची कथा अतिशय उत्तमरीत्या रेखाटली आहे. जी अभिनेत्रीनेही तितक्याच योग्य पध्दतीने प्रेक्षकांना वाचून दाखवली. नेहमीप्रमाणे स्पृहाच्या या व्हिडिओलाही चाहत्यांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

हेही वाचा :

Latest Post