×

जेव्हा नायकावर भारी पडले खलनायक, नकारात्मक भूमिका साकारून ‘या’ कलाकारांनी मिळवलीय वाहवा!

बॉलिवूड असो किंवा हॉलिवूड, चित्रपटांच्या शेवटी खलनायकालाच नायकाकडून हार पत्करावी लागते. मात्र असेही काही खलनायकी पात्र आहेत, ज्यांनी नायकापेक्षा जास्त वाहवा मिळवली. नुकताच प्रदर्शित झालेला हॉलिवूड चित्रपट ‘डॉक्टर स्ट्रेंज २’ जगभरात धुमाकूळ घालत आहे. पण या चित्रपटात बेनेडिक्ट कंबरबॅचपेक्षा एलिझाबेथ ओल्सेनचीच जास्त चर्चा होत आहे. या चित्रपटात तिने साकारलेल्या वांडा मॅक्सिमॉफच्या नकारात्मक भूमिकेचे प्रेक्षक भरभरून कौतुक करत आहेत.

केवळ हॉलिवूडच नाही, तर बॉलिवूडमध्येही अशी अनेक नकारात्मक पात्रे आहेत, ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. ‘मदर इंडिया’चा सुखी लाला असो की, ‘शोले’चा गब्बर, या पात्रांचा प्रभाव प्रेक्षकांच्या मनाव चित्रपटाच्या नायकापेक्षा कमी नव्हता. आज आम्ही तुम्हाला या लेखात अशाच काही चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, जे आजही नायकामुळे नाही तर खलनायकामुळे आठवले जातात. (these bollywood movies where villains overshadowed heroes)

डर – शाहरुख खान (Shahrukh Khan)
नव्वदच्या दशकातला हा असा चित्रपट होता, ज्यात नायकापेक्षा खलनायकाची जास्त प्रशंसा झाली होती. यश चोप्राच्या या चित्रपटात शाहरुख खानने प्रेमात वेड्या झालेल्या माणसाची नकारात्मक भूमिका साकारली होती. या चित्रपटात सनी देओल आणि जुही चावला देखील होते. पण शाहरुखने आपल्या दमदार अभिनयाने सर्वांची वाहवा मिळवली.

अग्नी साक्षी – नाना पाटेकर (Nana Patekar)
या यादीत ‘अग्नी साक्षी’ हा चित्रपटही आहे. हा चित्रपट १९९६ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर आणि मनीषा कोयराला मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटात नाना पाटेकर यांनी एका संशयास्पद पतीची नकारात्मक भूमिका साकारली होती, जो आपल्या पत्नीला सतत मारहाण करतो. पार्थो घोष दिग्दर्शित या चित्रपटात जॅकी श्रॉफ नायक होते, पण खलनायक नाना पाटेकर यांच्या अभिनयाची अधिक प्रशंसा झाली.

हासिल – इरफान खान (Irrfan Khan)
इरफान खान यांच्या ‘हासिल’ चित्रपटाला कल्ट चित्रपटाचा दर्जा प्राप्त आहे. चित्रपटात त्यांचे पात्र नकारात्मक असूनही, त्यांचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला. तिग्मांशु धुलिया दिग्दर्शित हा चित्रपट त्यावेळी फ्लॉप ठरला, पण नंतर हळूहळू या चित्रपटाची क्रेझ वाढत गेली. विद्यार्थी राजकारणावर बनलेला हा चित्रपट आजही चाहत्यांना पाहायला आवडतो.

ओमकारा – सैफ अली खान (Saif Ali Khan)
साल २००६ मध्ये आलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल भारद्वाज यांनी केले होते. शेक्सपियरच्या ‘ओथेलो’ या नाटकावर आधारित या चित्रपटात अजय देवगण, सैफ अली खान, करीना कपूर आणि विवेक अग्निहोत्री यांनी भूमिका केल्या होत्या. मात्र, अजयसारखा उत्तम अभिनेता असूनही, सैफ अली खानची लंगडा त्यागीची भूमिका प्रेक्षकांच्या हृदयाला भिडण्यात यशस्वी ठरली.

एक व्हिलन – रितेश देशमुख (Riteish Deshmukh)
बालाजी मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली २०१४ मध्ये बनलेला ‘एक व्हिलन’ हा चित्रपट त्या वर्षातील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक आहे. मोहित सुरी दिग्दर्शित या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसले होते. त्याचवेळी विनोदी चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेला रितेश देशमुख या चित्रपटात पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेत दिसला होता. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही जबरदस्त कमाई केली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post