व्हॅलेंटाईन डे स्पेशल! आपली प्रेम कहाणी सांगताना इंडियन आयडलच्या मंचावरच‌ भारती झाली भावूक

TV Bharti Singh Gets Emotional While Dancing With Husband Harsh Limbachiyaa On Indian Idol 12


‘व्हॅलेंटाईन वीक’ सुरू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ‘व्हॅलेंटाईन डे’ हा रविवारी (१४ फेब्रुवारी) आहे. याचा फायदा घेऊन टेलिव्हिजनवर अनेक रियॅलिटी शोमध्ये प्रेमाच्या गोष्टी बोलल्या जात आहेत. सोनी टीव्हीवरील सिंगिग रियॅलिटी शो ‘इंडियन आयडल 12’ संडे प्रोमो नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे. हा रविवार ‘व्हॅलेंटाईन स्पेशल डे’ बनवला जाणारा आहे. या दिवशी खास गोष्ट ही असणार आहे की, ‘भारती सिंग’ आणि ‘हर्ष लिंबाचिया’ यांची लव्ह स्टोरी सगळ्या प्रेक्षकांना दाखवण्यात येणार आहे. या व्हिडिओमध्ये असे दाखवले आहे की, हर्ष सोबतचं आपलं नात सांगताना भारती खूपच भावनिक होऊन जाते आणि रडू लागते.

मेकर्सने या एपिसोडचा एक व्हिडिओ इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यामध्ये भारती सिंग भावनिक होताना दिसून येते. या व्हिडिओमध्ये सायली आणि आशिष कुलकर्णी हे स्पर्धक जेव्हा ‘जब कोई बात बिघड जाये’ हे गाणे गातात, तेव्हा सगळ्या जोड्या त्यावर रोमँटिक डान्स करतात. पण जेव्हा हर्ष आणि भारती या गाण्यावर डान्स करायला समोर येतात, तेव्हा भारती खूपच भावनिक होताना दिसते.

त्यांच्या नात्याबद्दल सगळ्या प्रेक्षकांना सांगताना भारती असे म्हणते की, “हर्ष माझा पती म्हणून माझ्या आयुष्यात आहे. यासाठी मी स्वत:ला खूपच लकी समजते. हर्ष माझा पाहिला बॉयफ्रेंड आहे आणि मी त्याच्याशीच लग्न केले. हे गाणे ऐकून मला असं वाटायला लागले आहे की, हर्ष शिवाय मी माझ्या आयुष्यातल्या एका क्षणाचीही कल्पना करू शकत नाही. मला अस वाटतं आहे की, आम्ही या जगातील कदाचित पहिलेच असे जोडपे असू की, आम्ही एकत्रच या जगातून निघून जाऊ.”

भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया या जोडीला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे. सगळ्यांना त्याची जोडी खूप आवडते. ते दोघे नेहमीच एकमेकांसोबत मजा मस्ती करताना दिसून येतात. त्यामुळे प्रेक्षकांना देखील त्यांना बघायला खूपच आवडते. परंतु इंडियन आयडलच्या मंचावर या दोघांचं प्रेम देखील प्रेक्षकांना खूप भावलं.

इंडियन आयडलमधे रविवार हा स्पेशली व्हॅलेंटाईन डे स्पेशल आहे ज्यामध्ये भारती सिंग, हर्ष लिंबाचिया, आदित्य नारायण त्याची पत्नी श्वेता अग्रवाल, नेहा कक्कर पती रोहनप्रीत सिंग, हिमेश रेशमिया पत्नी सोनम कपूर सोबत स्पेशल गेस्ट म्हणून या शोमधे सगळ्यांना दिसणार आहेत. या शोमध्ये नेहा देखील तिचा पती रोहनप्रित अग्रवाल याच्या साठी खूप भावनिक होताना दिसून येते. नेहा म्हणते की, “जर रोहू या जगात नसेल, तर मला देखील या जगात नाही राहायचं, मी रोहू शिवाय मरायला तयार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

-नोरा फतेहीच्या ‘या’ गाण्याने लावली इंटरनेटवर आग; एकाच आठवड्यात पार केला ६ कोटी व्ह्यूजचा टप्पा, पाहा व्हिडिओ
-गावाकडच्या पोरानं आपल्या डान्सनं ‘धकधक गर्ल’ला लावले वेड; मग माधुरीनेही केली मोठी घोषणा
-बिग बींना जया बच्चन यांच्यासोबत जायचे होते लंडनला; वडील हरिवंशराय बच्चन यांना समजल्यावर म्हणाले होते, ‘आधी…’
-ए भावड्या जरा इकडं बघ! टोनी कक्करच्या ‘बूटी शेक’ गाण्यात झळकली ‘ही’ अभिनेत्री, व्हिडिओला मिळाले ९० लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज


Leave A Reply

Your email address will not be published.