अनुप जलोटा यांना केलेल्या किसवर जसलीन मथारूने सोडले तब्बल २ वर्षांनी मौन, काय म्हणाली वाचा


भजन सम्राट अनुप जलोटा गेल्या काही वर्षांत भजनाव्यतिरिक्त इतर गोष्टींमुळेही चर्चेत आले आहेत. जसलीन मथारूसोबत ‘बिग बॉस १२’ मध्ये भाग घेतल्यापासून या दोघांच्या नात्याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. ‘बिग बॉस १२’ मध्ये दोघांनी जोडी म्हणून प्रवेश केला होता. शोमध्ये या दोघांनीही आपापल्या नात्याचा खुलासा केला होता. तथापि शो संपल्यानंतर अनुप जलोटा या नात्यातून माघार घेतली होती. शोदरम्यान जसलीनने अनुप जलोटांना किस केले होते. यामुळे तो शो बर्‍याच चर्चेत आला होता. आता जसलीन मथारू आणि अनुप जलोटा पुन्हा एकदा त्यांच्या त्या किसमुळे चर्चेत आले आहेत.

जसलीन मथारूने दोन वर्षानंतर अनुप जलोटा यांना केलेल्या किसवर भाष्य केले आहे. जसलीन मथारूने अशा लोकांवर संताप व्यक्त केला आहे, ज्यांनी किसला मोठा मुद्दा बनवला आहे. वृत्तांनुसार, जसलीनने त्यात या किसचा उल्लेखही केला होता.

जसलीन मथारू हिने म्हटले आहे की, अनुप जलोटांना मिठी मारणे, म्हणजे अभिवादन करण्याचा मार्ग आहे. त्यांच्यासाठी ही फार मोठी गोष्ट नाही, आणि मी त्यांच्या पाय पडणे गरजेचे नाही. त्यांचा असा विश्वास आहे की, एकमेकांना अभिनंदन करण्याचा हा एक मार्ग आहे, आणि त्यांना यात काहीही चुकीचे वाटत नाही.

बिग बॉस शोमध्ये अनुप जलोटांची किस घेण्याबाबत जसलीन मथारू म्हणाली, ‘जर मी त्यांना गालावर किस केले, आणि म्हणाले ती लिपस्टिक तशीच राहुदेत. मी अशीच आहे. हा माझा विनोद आहे. आम्ही असेच विनोद करतो, आणि अनुपजी मला बर्‍याच वर्षांपासून ओळखतात, त्यांना ही गोष्ट देखील माहित आहे. आम्ही ते गांभीर्याने घेत नाही, पण असे काही लोक आहेत, जे किस केला या गोष्टीला महत्त्वाचा मुद्दा बनवतात. यात काय विशेष आहे? ‘

ती पुढे बोलताना म्हणाली की, “मी माझ्या आई किंवा वडिलांसोबत व्हॅलेंटाईन डे ला डेटवर जाऊ शकत नाही?नक्कीच जाऊ शकते. मी डेटवर अनुप जींबरोबर गेले, माझ्या गुरुजींसोबत तर त्यात लव्ह अँगल संकल्पनाची आवश्यकता नाही.”

‘बिग बॉस १२’मधून बाहेर पडल्यानंतर अनुप जलोटा आणि जसलीन मथारू यांनी त्यांच्या नात्याचा विषय नाकारला होता. त्यांनी सांगितले की, त्यांनी हे शोसाठी केले आहे. या दोघांनी हे स्पष्ट केले होते की, त्यांचे नाते फक्त गुरु आणि शिष्य असे आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनेत्री बनूनही रिंकू राजगुरूने आजपर्यंत केले नाही ‘हे’ काम; तुम्हीही म्हणाल, ‘हे कसं काय बरं!’

-‘चित्रपटसृष्टीमध्ये होतो लिंगभेद’, अभिनेत्री दिया मिर्झाचा फिल्म इंडस्ट्रीवर मोठा आरोप

-पाकिस्तानी पंतप्रधान इमरान खानसोबत लग्नबंधनात अडकणार होती रेखा, अभिनेत्रीची आई कुंडली घेऊन थेट पोहोचली होती ज्योतिषीकडे


Leave A Reply

Your email address will not be published.