राजस्थानी लेहंगा घालून उर्वशी रौतेलाने केले फोटोशूट; तिच्या वरून नजर हटविणेही झाले कठीण


बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणजे उर्वशी रौतेला होय. तिने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. परंतु आज बॉलिवूडमध्ये‌ तिने सर्वत्र तिचे नाव कमावले आहे. तिच्या चित्रपटातील अभिनयामुळे किंवा व्हिडिओमुळे ती‌ नेहमीच चर्चेत असते. या व्यतिरिक्त ती तिच्या फॅशन सेन्समुळे आणि बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते. नुकतेच तिने गुजराती लेहंगा घालून फोटोशूट केले आहे. जे सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. (Uravshi Rautela’s rajasthani look Photo viral on social media)

उर्वशीने नुकतेच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने पोपटी रंगाचा आणि निळ्या रंगाचा राजस्थानी लेहंगा घातला आहे. तिच्या या लेहंग्यावर रेशमी धाग्याने लाईट वर्क केले आहे. तिचा हा लेहंगा खूपच सुंदर दिसत आहे. तसेच यावरील दुपट्टा देखील खूप सुंदर आहे.

उर्वशीने राजस्थानी पद्धतीची सगळी ज्वेलरी घातली आहे. तिने ड्रेसला मॅचींग असे गळ्यातले, कानातले, बिंदी आणि बाजूबंद देखील घातले आहे. त्यामुळे तिचा हा लूक परिपूर्ण झाला आहे. तसेच हातात बांगड्या आणि केसात फुलं माळली आहेत.

याआधी देखील उर्वशीने मल्टी कलरची साडी घालून फोटो शेअर केले होते. तसेच तिने निळ्या रंगाचा स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान केला होता. उर्वशीच्या या साडीची किंमत ५८ लाख एवढी आहे. या साडीसोबतच तिने जड दागिने घातले होती. तसेच मेकअप देखील केला होता.

उर्वशी रौतेलाच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाल्यास, ती ‘ब्लॅक रोज’, ‘थ्रीतूत्तु पायले २’ आणि वेब सीरिज ‘इन्स्पेक्टर अविनाश’ यामध्ये दिसणार आहे. उर्वशी ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचे ३६ मिलियनपेक्षाही जास्त फॉलोवर्स आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.