×

‘क्यों मैं डोली’ म्हणणाऱ्या उर्फी जावेद केस झटकले काय आणि नेटकरी घायाळच झाले ना राव

पुन्हा एकदा उर्फी जावेदने (Urfi Javed) तिच्या नवीन फॅशनेबल ड्रेसचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. उर्फी तिच्या कामामुळे कमी आणि तिच्या अतरंगी फॅशनमुळे जास्त चर्चेत असते. बिग बॉसच्या ओटीटी पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाल्यानंतर उर्फीला अधिक लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली. भलेही बिग बॉसमध्ये उर्फी जास्त काळ टिकू शकली नाही, मात्र ती जेवढा वेळ होती तेवढ्याच काळात तिला चांगलीच ओळख मिळाली. बिग बॉसमध्ये येण्यापूर्वी देखील तिने काही मालिकांमध्ये काम केले होते, मात्र त्यात तिला अपेक्षित यश मिळाले नाही. पण बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर तिने तिच्या आगळ्या वेगळ्या फॅशनमुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात लक्ष आकर्षित करून घेतले. आता उर्फी जावेद नाव उच्चरले तरी तिच्या कपड्यांबद्दलच काही असणार हे सर्वांना आधीच माहित असते.

अतिशय हटके, विचित्र, अतरंगी फॅशनमुळे उर्फीला अमाप प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली. आता पुन्हा एकदा तिच्या हटके कपड्यांमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आपल्या स्टाईल आणि बिनधास्त अंदाजामुळे उर्फी सतत मीडियामध्ये आणि सोशल मीडियावर लाइमलाईटमध्ये असते. प्रत्येक दिवशी उर्फी तिच्या नवीन आणि हटके फॅशनमुळे लोकांना सरप्राईज करत असते. नुकताच तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ (Urfi Javed New Video) शेअर केला आहे, ज्यामुळे ती पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Urrfii (@urf7i)

उर्फीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला असून, या व्हिडिओमध्ये सुरुवातीला उर्फीची पाठ दिसते. ज्यात दिसते की, उर्फीने घातलेला ड्रेस फक्त एका दोरीने बांधलेला आहे. पुढे उर्फी तिचे केस झटकते आणि तिचा ग्लॅमरस अवतार सर्वांना दाखवते. ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटेड ड्रेसमध्ये अतिशय मादक अदा दाखवताना दिसत आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला ‘जानें क्यों मैं डोली’ हे गाणे वाजताना ऐकू येत आहे. या अवतारात तिचा सिझलिंग लूक नेटकऱ्यांना खूपच आवडत असून, त्यावर अशा कमेंट्स देखील येत आहे.

या व्हिडिओमध्ये उर्फीने अतिशय लाईट मेकअप केला असल्याने ती या व्हिडिओमध्ये इतर व्हिडिओपेक्षा वेगळी दिसत आहे. कारण नेहमी ती हेव्ही मेकअप मध्येच दिसत असते. उर्फीने २०१६ साली ‘भैया की दुल्हनिया’ मधून तिच्या अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये काम केले.

हेही वाचा :

सौंदर्याची खाण असलेल्या सोनाली कुलकर्णीचे बोल्ड फोटो समोर, चाहते म्हणतायेत, ‘इथे आग लागली ना राव’

मॉलमध्ये शॉपिंग करायला गेलेल्या अनुष्का शर्माचे चमकले नशीब, ‘अशी’ मिळाली किंग खानसोबत काम करण्याची संधी

‘आमच्या पवानगीशिवाय…’ सिद्धार्थ शुक्लाच्या कुटुंबाने त्याचा चाहत्याने दिले ‘हे’ अनोखे आवाहन

Latest Post