रणदीप हुड्डा- उर्वशी रौतेला अभिनित ‘इंस्पेक्टर अविनाश’च्या सेटवर आग; गोरेगाव फिल्मसिटीमध्ये चालू होती शूटिंग


शूटिंग सेटवर अनेक अनपेक्षित आणि दुर्दैवी घटना बऱ्याचदा घडताना आपल्याला दिसतात. अशा घटना कधी कधी जीवघेण्या किंवा वित्तीय नुकसान करणाऱ्या ठरतात. सेटवर आग लागण्याच्या घटना अधेमधे नेहमी कानावर येतच असतात. आज पुन्हा अशीच एक घटना मुंबईमध्ये घडली आहे.

अभिनेता रणदीप हुड्डा आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला यांच्या आगामी ‘इंस्पेक्टर अविनाश’ सिरीजची शूटिंग मुंबईमध्ये सुरु आहे. ही सिरीज घोषणेपासूनच चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र याच सिरीजच्या सेटवरून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुरुवारी (१५ जुलै) रोजी उर्वशी आणि रणदीप यांच्या ‘इंस्पेक्टर अविनाश’ या वेबसिरीजच्या सेटवर आग लागली होती. ही आग लागल्यानंतर सेटवर मोठ्या स्वरूपाचा गोंधळ निर्माण झाला होता. मात्र यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा कोणी गंभीर झाल्याची माहिती समोर आली नाहीये. प्राप्त माहितीनुसार गोरेगाव फिल्मसिटीमध्ये या वेबसिरीजचे शूटिंग सुरु असता, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली.

जेव्हा ही आगीची घटना घडली, तेव्हा कलाकार एका कोर्टरूमच्या सीनची शूटिंग करत होते. सध्या या सिरीजच्या शूटिंगचा तिसरा टप्पा सुरु आहे. मीडियामध्ये व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, ही सिरीज याच वर्षी प्रदर्शित होऊ शकते. ‘इंस्पेक्टर अविनाश’ ही एक थ्रिलर सिरीज असून, ही  सुपरकॉप म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या अविनाश मिश्रा आणि पूनम मिश्रा यांची बायोपिक असणार आहे. या सिरीजचे दिग्दर्शक नीरज पाठक यांचे असून, या सिरीजच्याच निमित्ताने पहिल्यांदा रणदीप हुड्डा आणि उर्वशी सोबत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लग्नापूर्वी दिशाच्या रूमबाहेर ‘मेरी दुल्हन कहा है’, म्हणत ओरडताना दिसला राहुल; नववधू बाहेर येताच…

-सुपरस्टार नागार्जुनची सून समंथाने कुत्र्यासोबत मस्ती करतानाचा व्हिडिओ केला शेअर, म्हणाली, ‘माझा गुड बॉय आणि…’

-महाकठीण! ‘या’ फोटोतील कपिल शर्माला ओळखलं का? कॉमेडियनने दिलं मजेशीर चॅलेंज


Leave A Reply

Your email address will not be published.