बाबो! सुंदर दिसण्यासाठी उर्वशी रौतेलाची आगळीवेगळी थेरपी; थेट चिखलातच केले तिने फोटोशूट


बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून उर्वशी रौतेला ओळखली जाते. तिने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. परंतु आज बॉलीवूडमध्ये‌ तिने सर्वत्र तिचे नाव कमावले आहे. तिच्या चित्रपटातील अभिनयामुळे किंवा व्हिडिओमुळे ती‌ नेहमीच चर्चेत असते. या व्यतिरिक्त ती तिच्या फॅशन सेन्समुळे आणि बोल्ड अंदाजामुळेही चर्चेत येत असते. अशातच तिचा एका फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे.

खरंतर बॉलिवूड कलाकारांसाठी सौंदर्य म्हणजे सर्व काही असते. त्यांची त्वचा चमकदार ठेवण्यासाठी, तसेच सुंदर दिसण्यासाठी ते अनेक गोष्टी करत असतात. काहीजण मेडिकल ट्रीटमेंट घेतात तर काहीजण अनेक कॉस्मेटिकचा वापर करतात. एवढंच काय तर काहीजण अगदी प्लास्टिक सर्जरी देखील करताना दिसले आहेत. पण आपल्या त्वचेला एक वेगळा रंग आणि तेज आणण्यासाठी अभिनेत्री उर्वशी रौतेलाने एक वेगळाच पर्याय अवलंबला आहे. याचे दर्शन तुम्हाला तिने शेअर केल्या फोटो वरून येईल.

अभिनेत्री उर्वशी रौतेलाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने संपूर्ण अंगाला चिखल लावलेला आहे. ती संपूर्ण अंगाला चिखल लावून एका स्टूलवर उन्हात बसलेली दिसत आहे. अगदी केसांना देखील तिने चिखल लावलेला दिसत आहे. हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “माझा आवडता चिखलाचा बाथ स्पा. चिखलाची थेरपी.” (Urvashi Rautela’s mud bath photo viral on social media take a look)

त्यासोबतच तिने चिखलामुळे आपल्या त्वचेला होणारे फायदे देखील नमूद केले आहेत. तिने सांगितले आहे की, चिखलामुळे आपली त्वचा मुलायम राहते तसेच त्वचेची रक्ताभिसरण प्रक्रिया देखील चांगली होते. तिचा हा फोटो आणि तिने दिलेली सौंदर्याबाबत माहिती तिच्या चाहत्यांना खूपच आवडली आहे. अनेकजण या फोटोवर प्रतिक्रिया देत आहेत.

उर्वशी रौतेलाच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाल्यास, ती ‘ब्लॅक रोज’, ‘थ्रीतूत्तु पायले २’ आणि वेब सीरिज ‘इन्स्पेक्टर अविनाश’ यामध्ये दिसणार आहे. उर्वशी ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचे ३६ मिलियन पेक्षाही जास्त फॉलोवर्स आहे, जे तिच्या पोस्ट्सला भरभरून प्रेम देत असतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लॉकडाऊननंतर ‘बिग बी’ प्रथमच निघाले शूटिंगवर; फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

-‘तू ऐलराधा, तू पैल संध्या!’ पाहा निसर्गाच्या सानिध्यात हरवलेल्या मृण्मयी देशपांडेची नैसर्गिक सुंदरता

-‘आयुष्यात विस्कटलेल्या गोष्टी गुंडाळता येत नसतील, तर…’, सुंदर फोटोवर ‘स्वीटू’ने लिहिलं लक्षवेधी कॅप्शन


Leave A Reply

Your email address will not be published.