×

एक सत्य, जे बनले सर्वांचे रहस्य! ‘शेरनी’च्या नवीन सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला, एकदा पाहाच

विद्या बालन आणि शेफाली शाह यांचा चित्रपट ‘जलसा’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. विद्या या चित्रपटात पत्रकाराच्या पात्रात दिसत आहे, तर शेफालीने एका आईचे पात्र साकारले आहे. जे काहीतरी गुपित लपवत आहे. ट्रेलरची सुरुवात एका मुलीच्या अपघाताने होतो. त्यानंतर या प्रकरणासंबंधित माध्यमांमध्ये चर्चा होते. पुढे या प्रकरणाशी संबधित गोंधळ निर्माण होतो आणि काही गुपिते समोर येतात. ट्रेलरमध्येच या दोघींचा जबरदस्त अभिनय बघायला मिळाला आहे. ट्रेलरच्या टॅगलाईनने सगळ्याचे लक्ष वेधून घेतेले आहे. त्यात ते म्हणतात, एक सत्य जे बनले सर्वांचे रहस्य.

कोरोनामुळे निर्मात्यांनी ‘जलसा’ (Jalsa) हा चित्रपट ऍमेजॉन प्राइम व्हिडिओ प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. असे म्हणले जात आहे की, या चित्रपटातील मुख्य भूमिका साकलेली अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) या निर्णयामुळे नाखुश होती. मात्र, तिचे शेवटचे दोन्ही चित्रपट ‘शकुंतला देवी’ आणि ‘शेरनी’ ओटीटीवर प्रदर्शित झाले होते. या दोन्ही चित्रपटाला लोकप्रियता मिळाली होती. त्यामुळे तिनेही होकार दिला. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेश त्रिवेणींनी केले आहे. तसेच, या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार आणि कृष्ण कुमारने यांनी केली आहे. चित्रपटात विद्यासोबत शेफाली शाह, मानव कौल, इकबाल खाव, श्रीकांत मोहन यादव, शाफीन पटेल हेही भूमिका साकारत आहेत.

विद्याने या चित्रपटाविषयी बोलताना सांगितले की, “जे काही आम्ही करत असतो त्यामध्ये काहीतरी सामाजिक मुद्दा असतो. पण आम्ही एक गोष्ट सांगत असतो. ही चांगली गोष्ट आहे. आम्हाला आमच्या कहानीने लोकांच्या मनाला स्पर्श करायचा असतो. या चित्रपटात प्रत्येकांसाठी काहीतरी आहे. फक्त माया आणि रुकसानासारख्या महिलांसाठी नाही.” अर्थात ही कहाणी दोन पात्राच्या माध्यमातून सांगितले आहे. परंतु ही एक अशी कहाणी आहे, जिच्याशी प्रत्येकजण जोडले जातात. अगदी पुरुषही जोडले जातात.

शेफाली शाहसोबत काम करण्याबद्दल तिने सांगितले आहे की, “मी अनेक प्रतिभशाली कलाकारासोबत कामे केली आहेत. शेफालीही त्यापैकीच एक आहे. मी तिच्यासोबत पहिल्यांदा एका टीव्ही शोमध्ये काम केले होते. मला नाही माहीत तिला आठवण आहे की नाही. ती जे काही करते, त्यातून मला प्रेरणा देते. तिची फिल्मोग्राफी जबरदस्त आहे.”

विद्या बालनने आतापर्यंत  शेवटची ‘शेरनी’ या सिनेमात झळकली होती. तिच्याविषयी खास गोष्ट अशी की, तिला इंग्रजी, हिंदी, मल्याळम आणि तामिळ या भाषा बोलता येतात. विशेष म्हणजे, सन २००५ साली तिने ‘परिणीता’ या सिनेमात काम केल्यानतंर ती बंगाली भाषाही थोडीफार बोलते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Latest Post