भाईजानचा सल्ला! सलमानने मित्राच्या लग्नाचा व्हिडिओ केला शेअर; त्याच्या पत्नीला म्हणाला, ‘अजूनही वेळ…’

Watch Bollywood Actor Salman Khan Shares His Childhood Friend Sadiq Marriage Video Advice His Friend Wife Rehaana To Run Away Video


‘भाईजान’ म्हणजेच बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान हा तसा सोशल मीडियावर क्वचितच सक्रिय असतो. चित्रपटाच्या शूटिंग आणि ‘बिग बॉस’च्या होस्टिंगमध्ये सलमान आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्याची संधी मुळीच सोडत नाही. तो आपल्या सोशल मीडियावर चित्रपटाच्या प्रमोशनपासून ते रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींचे फोटो शेअर करत असतो. नुकतेच त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो जोरदार व्हायरल होत आहे.

मजेशीर गोष्ट अशी की, हा व्हिडिओ सलमान खानचा नाही, तर त्याचा मित्र सदिकच्या लग्नातील आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून सलमानने मित्राला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्याची पत्नी रेहानाला पळून जाण्याचा सल्ला दिला आहे.

सलमानने व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, सदिक त्याच्या लहानपणीचा मित्र आहे आणि हा किस्सा ३३ वर्षे जुना आहे. त्याने सदिकच्या लग्नाच्या ३३ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. व्हिडिओत सदिक आणि त्याची पत्नी रेहाना दिसत आहेत.

व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “लहानपणीचा मित्र सदिक. लहानपणीचा म्हणजे मी जेव्हा लहान मुलगा होता आणि त्याने ३३ वर्षांपूर्वी लग्न केले होते. रेहानासाठी आदर, जिने याची सेवा केली आणि हे लग्न यशस्वी करून दाखवले. लग्नवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!., रेहानासाठी शेवटचा सल्ला, अजूनही वेळ आहे, पळून जा… हाहाहा.”

खरंतर सलमान खान सध्या खूपच व्यस्त आहे. तो सलग ४ सिनेमांमध्ये दिसणार आहे. त्यामध्ये ‘अंतिम द फायनल ट्रूथ’, ‘किक २’, ‘राधे योर मोस्ट वॉन्टेड’  आणि ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटांचा समावेश आहे. सध्या सलमान खान राधे चित्रपटाची शूटिंग करत आहे. याव्यतिरिक्त तो टीव्हीवरील प्रसिद्ध ‘बिग बॉस १४’ शोचे होस्टिंगही करताना दिसत आहे. बिग बॉसचा फिनाले हा २१ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

‘भाऊ, तेवढंच काम राहिलंय आता…’, सोनू सूदकडे चाहत्याने केली अशी तक्रार की अभिनेत्याने तिथेच जोडले हात
द लेजेंड हनुमान  सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित, जाणून घ्या कोणता रोल निभावतो मराठमोळा शरद केळकर?
तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरतंय स्पेलंडर  गाणं, रिलीज झाल्यापासून चार दिवसांत मिळालेत लाखो हिट्स
गुरु रंधावाच्या या गाण्याचा मेकिंग व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ; हिट्स लाखोंच्या घरात
प्रीती झिंटाच्या  बुमरो बुमरो  गाण्यावर काश्मिरमध्येच थिरकली शहनाज गिल, व्हिडीओने सोशल मीडियावर मिळविल्या लाखो हिट्स


Leave A Reply

Your email address will not be published.