झरीन खानच्या ‘मशहूर है तू’ गाण्याची इंटरनेटवर धमाल! मिळाले तब्बल २६ लाखांहून अधिक व्ह्यूज

zareen khan mashhoor hai tu song released video viral on internet


अभिनेत्री झरीन खानने बॉलिवूडपासून ते पंजाबी चित्रपटसृष्टीपर्यंत, स्वतःची जबरदस्त ओळख निर्माण केली आहे. ही अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते आणि सातत्याने आपल्या पोस्टवरून चर्चा रंगवत असते. नुकताच झरीन खानचा एक म्युझिक व्हिडिओ रिलीझ झाला आहे, जो इंटरनेटवर धमाल करत आहे. या गाण्याचे नाव आहे, ‘मशहूर है तू.’ या व्हिडिओमध्ये झरीन खानसोबत अभिनेता अंशुमन झाची जोडी चांगलीच जमलेली पाहायला मिळाली आहे.

झरीन खानचे नवीन गाणे ‘मशहूर है तू’ काही २६ एप्रिलला रिलीझ झाले होते. व्हिडिओच्या लोकप्रियतेबद्दल बोलायचे झाले, तर या गाण्याला आतापर्यंत २६ लाखांहून अधिक वेळा पाहिले गेले आहे. हे गाणे झी म्युझिक कंपनीच्या बॅनरखाली रिलीझ करण्यात आले आहे. गाण्यात आदिर रशिदने आपला आवाज दिला आहे. त्यामध्ये ओनी-आदिलने गाण्याला संगीत दिले आहे, तर सौरभ नेगीने त्याचे गीत लिहिले आहे.

झरीन खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती लवकरच प्रिन्स नरुलासोबत एका म्युझिक व्हिडिओमध्ये दिसणार आहे. तिच्या कारकीर्दीबद्दल बोलायचे म्हटले, तर तिने २०१० मध्ये सलमान खानसोबत, ‘वीर’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

या व्यतिरिक्त झरीन खान ‘१९२१’ या हॉरर चित्रपटातही दिसली होती, परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशाचा झेंडा गाठू शकला नाही. इतकेच नाही तर २०१७ मध्ये आलेल्या तिच्या ‘अकसर २’ लाही बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला नाही. बॉलिवूड व्यतिरिक्त या अभिनेत्रीने तेलुगु आणि पंजाबी सिनेमांमध्येही आपला हात आजमावला आहे. अखेरच्या वेळेस, ती गिप्पी ग्रेवालसोबत पंजाबी चित्रपट ‘डाका’ मध्येही दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘दिलबर गर्ल’ नोहा फतेहीकडून चाहत्यांना डान्सचे धडे; पाहा धमाकेदार स्टेप्स

-कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी पुढे आले मिलिंद सोमण; प्लाझ्मा दान करण्यासाठी करतायत जोरदार व्यायाम, पाहा व्हिडिओ

-खरंच! ‘मी दिशाला किस केले नाही’, असं का म्हणाला सलमान खान? पाहा बिहाईंड द सीन्स व्हिडिओ


Leave A Reply

Your email address will not be published.