कॉलेजमध्ये असताना झरीन खानचे वजन होते तब्बल १०० किलोपेक्षाही जास्त; लोक म्हणायचे, ‘फॅट- रीना’

Zareen Khan revelas when she faced body shaming after entering bollywood


कॅटरिना कैफ सारखी दिसणारी आणि सलमान खानसोबत चित्रपटात पदार्पण करणारी सुंदर अभिनेत्री म्हणजे झरीन खान. झरीन ही कॅटरिना सारखी दिसते, असे तिला बॉलिवूडमध्ये आल्या दिवसापासून सगळेच म्हणत आहेत. झरीनने बॉलिवूडबाबत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. तिने सांगितले होते की, वजन वाढल्या कारणाने तिला अनेक वेळा बॉडी शेमिंगचा सामना करायला लागला आहे.

झरीन खानने 2019 मध्ये एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोमुळे ती खूपच ट्रोल झाली होती. त्याच कारण की, या फोटोमध्ये तिच्या पोटावर स्ट्रेच मार्क्स दिसत होते. या नंतर तिला ‘जाडी, जाडी’ म्हणत अनेक वेळा ट्रोल केले होते. काहींनी तिला ‘जाड- रीना,’ तर काहींनी ‘फॅट- रीना’ म्हटले होते.

बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर झरीनला अनेक वेळा बॉडी शेमिंगचा सामना करायला लागला होता, असे तिने सांगितले होते. बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याआधी तिचे वजन तिचे वजन 100 किलो पेक्षाही जास्त होते. परंतु यामुळे तिला कधीच कोणती अडचण आली नव्हती. परंतु बॉलिवूडमध्ये आल्यानंतर तिला खूप ट्रोल केले गेले. तिच्या स्ट्रेच मार्क्स वरून तिला खूप ट्रोल केले.

तिने सांगितले की, “हे अगदी खरं आहे की, मी जेव्हा शाळेत आणि कॉलेजमध्ये होते, तेव्हा माझे वजन 100 किलो पेक्षाही जास्त होते. त्यावेळी मला बोलायची कोणीच हिंम्मत केली नव्हती. मी जेव्हा केव्हा बॉडी शेमिंगबद्दल ऐकायची, तेव्हा मला वाटायचे की, हे लोक असे कसे बोलू शकतात. पण या गोष्टीची जाणीव मला चित्रपटांमध्ये आल्यावर झाली. मी विचार केला की, माझे वजन जेव्हा 100 किलो पेक्षाही जास्त होते, तेव्हा मला कोणीच काहीच बोलले नाही पण आता माझे वजन जवळपास निम्मे झाले आहे, तरीही मला या गोष्टीवरून का बोलत आहेत.”

तिने पुढे सांगितले की, “हे खूपच विचित्र होते पण या गोष्टींचा माझ्यावर काहीच परिणाम झाला नाही. मी एक अभिनेत्री आहे त्यामुळे मला माझ्या अभिनयाच्या जोरावर काय बोलायचे आहे ते बोला. माझे वजन, उंची, रंग या गोष्टींकडे नका बघू. बॉलिवूडमध्ये अशी अनेक माणसं आहेत जी म्हणतात की, बॉडी शेमिंग नाही केली पाहिजे पण जेव्हा ते चित्रपटासाठी अभिनेत्री निवडतात, तेव्हा त्यांना अगदी झिरो फिगर मुलगी हवी असते.”

झरीनच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘हाऊसफुल 2’, ‘वीर’, ‘हेट स्टोरी 3’, ‘1921’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. तिने ‘प्यार मंगता है’ या म्युझिक अल्बममध्ये देखील काम केले आहे. तिने 2019 मध्ये तेलुगु चित्रपटसृष्टीत देखील प्रवेश केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-स्वत: शाहरुख खानने मुलगा आर्यनला घरात विना शर्ट फिरण्यावर घातली होती बंदी, कारण जाणून तुम्हीही म्हणाल, ‘योग्य निर्णय!’

-जेव्हा १६ वर्षीय जन्नत झुबेरच्या किसींग सीनवर भडकली होती आई, वडिलांनी दिली होती अशी प्रतिक्रिया

-‘तेव्हा खिसा रिकामा असायचा, पण…’, म्हणत कपिल शर्माने शेअर केला २३ वर्ष जुना फोटो, सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ


Leave A Reply

Your email address will not be published.