‘…हे लाजिरवाणे’, कोरोना काळात मदत केली नाही म्हणणाऱ्या ट्रोलर्सला बिग बींनी शिकवला धडा

Actor Amitabh Bachchan Slams Trolls Reveals He Adopted 2 Children Who Lost Both Parents During Covid- 19


कोरोना व्हायरसची दुसरी लाट खूपच भयंकर आहे. दररोज लाखो संख्येने लोक या व्हायरसच्या कचाट्यात सापडत आहेत, तर हजारोंना आपला जीव गमवावा लागत आहे. अशामध्ये बॉलिवूडचे मोठ- मोठे कलाकार यादरम्यान मदतीचा हात पुढे करताना दिसत आहेत. यामध्ये सोनू सूद, सलमान खान आणि अमिताभ बच्चन यांसारख्या अनेक कलाकारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे काही कलाकार असे आहेत, जे गुपचूपपणे मदत करत आहे. परंतु यामुळे त्यांना ट्रोलर्सचा सामना करावा लागत आहे. त्यांनी मदत केली नाही, असं म्हणत ट्रोलर्सकडून त्यांच्यावर निशाना साधला जात आहे. असेच काहीसे बिग बींसोबत घडले आहे. परंतु ‘एँग्री यंग मॅन’ बिग बींनीही या ट्रोलर्सला चांगलाच धडा शिकवला आहे. यासोबतच त्यांनी सांगितले की, कशाप्रकारे ते गरजू व्यक्तींची मदत करत आहेत.

बिग बींनी अशा लोकांची तोंडं बंद करण्यासाठी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, ते मदत करण्यात विश्वास ठेवतात. याबाबत चर्चा करण्यात नाही. त्यांनी लिहिले की, “होय मी मदत करतो, परंतु याबाबत चर्चा नाही केली पाहिजे. हे लाजिरवाणे असते.” त्यांनी पुढे सांगितले की,”मागील काही वर्षांमध्ये त्यांच्या कुटुंबाने जितकी मदत केली आहे, त्या गोष्टी सांगायच्या नाहीत आणि सोशल मीडियावरही याबद्दल काही म्हटले नाही. केवळ ही मदत ज्यांना मिळालीय त्यांनाच याबाबत माहिती आहे.”

यासोबतच त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये माहिती दिली आहे की, मागील अनेक वर्षांमध्ये त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने दान केले आहे, परंतु त्या पैशांबाबत सांगितले नाही. शेतकऱ्यांचे कर्ज फेडण्यासाठी त्यांनी सांगितले की, अभिषेक आणि श्वेता पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबाचीही मदत करतात.

बिग बींनी पुढे सांगितले की, मागील वर्षी त्यांनी जवळपास प्रत्येक महिन्यात ४ लाख लोकांना दर महिन्याचे जेवण पुरवले आहे. आजही ते दररोज शहरातील ५००० लोकांच्या नाश्ताची आणि जेवणाची सोय करतात. इतकेच नाही, तर फ्रंटलाईन वर्कर्स, पोलीस, हॉस्पिटलमध्ये उपस्थित असणाऱ्या हजारो लोकांसाठी मास्क आणि पीपीई किटचे वाटप करत आहेत. सोबतच त्यांनी प्रवाशांना त्यांच्या घरी पोहोचवणाऱ्या शीख कमिटीमध्येही दान केले आहे.

दोन मुलांना घेतले दत्तक
कोरोना व्हायरसमुळे आपले आई- वडिलांना गमावणाऱ्या दोन मुलांना बिग बींनी दत्तक घेतले आहे. त्यांना हैदराबादमधील एका अनाथाश्रममध्ये ठेवले होते. त्यांचा दहावीपर्यंतचा सर्व खर्च बिग बी उचलणार आहेत. ते अभ्यासात चांगले असतील, तर त्यांच्या पुढील शिक्षणाचा खर्चही उचलण्याचा निर्णय बिग बींनी घेतला आहे. 

रविवारी (९ मे) दिल्ली शीख गुरुद्वारा कमिटीचे अध्यक्ष मंजिंदर सिंग सिरसा यांनी सांगितले की, अमिताभ बच्चन यांनी २ कोटी रुपये दान केले आहेत. दिल्लीच्या श्री गुरु तेग बहादुर कोव्हिड केअर सेंटरसाठी ऑक्सिजन सिलेंडरची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. ते त्यांच्यासोबत संपर्कात आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अमिताभ बच्चन यांच्या बालपणीचे पात्र साकारून नाव कमावणारा ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता झाला अचानक गायब, आता करतो तरी काय?

-पत्नी आणि मुलींच्या जवळ राहण्यासाठी रणधीर कपूर होणार नवीन घरात शिफ्ट, आपल्या जुन्या घराबाबत उघड केले ‘हे’ गुपीत

-राधे चित्रपटातील किसींग सीनबाबत दिशा पटानीचा मोठा खुलासा, म्हणाली…


Leave A Reply

Your email address will not be published.