आजकालचे तरूण आरोग्य चांगले रहावे आणि आपण चांगले दिसावे यासाठी प्रचंड मेहनत घेतात. अनेक तरूण आपल्या डोळ्यांसमोर मोठ- मोठ्या स्टारची फिटनेस ठेवून जिममध्ये घाम गाळत असतात. प्रसिद्ध अभिनेता ऋतिक रोशनचा तर खूप मोठा चाहता वर्ग आहे. त्याच्या फिटनेसवर लाखो मुली आजही मरतात. 49वर्षिय ऋतिक आजही तरूण दिसतो. तो त्याच्या दमदार अभिनयाने लाखो चाहत्यांची मने जिंकत असतो. ऋतिकने आज पर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्याची फिटनेस आजही चर्चेत येते. पण तुम्हा माहित आहे का की ऋतिक या फिटनेससाठी प्रचंड मेहनत घेतो आणि पैसै देखील घालवतो.
मुलींपासून मुलांपर्यंत सगळ्यांनाच या ऋतिकच्या (Hrithik Roshan) स्टाईल आणि बॉडीचे वेड आहे. तुम्हालाही ऋतिक सारखी बॉडी हवी असेल, तर आजपासूनच तुमच्या आरोग्याकडे आणि फिटनेसकडे लक्ष देण्याची गरज आहे. बहुतेक मुलांचे स्वप्न असते की, तेही ऋतिक सारखे दिसावेत. पण आपल्या आहार आणि खाण्याच्या सवयींमुळे हे शक्य होत नाही. अभिनेता हृतिक रोशनसारखी बॉडी असावी अशी मुलांची इच्छा असते. ऋतिक रोशनच्या मसल्स, बॉडी आणि ऍब्सचे रहस्य म्हणजे त्याचा वर्कआउट. त्याच्या वर्कआउट रूटीनचा परिणाम म्हणजे तो पूर्णपणे तंदुरुस्त राहतो. अभिनेते त्यांच्या तब्येतीची खूप काळजी घेतो.
अभिनेता ऋतिक आपल्या जेवणात हिरव्या भाज्या खाण्यास प्राधान्य देतो. हिरव्या भाज्या खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषक द्रव्ये मिळतात. तो रोज वर्कआउट करत असतो. त्यासाठी तो जिममध्ये जातो. त्याच्या जिम ट्रेनरचे नाव क्रिस गेथिनला आहे. तो एक प्रसिद्ध ट्रेनर आहे. पण तुम्हाला एकून धक्का बसेल की, हृतिक त्याला महिनाभर तब्बल 20 लाख रूपये देतो.
दरम्यान, हृतिक रोशन विषयी बोलायचं झाले तर, तो बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात योग्य अभिनेत्यांमध्ये अव्वल स्थानावर आहे. तो अनेकदा त्याच्या फिटनेस टिप्स चाहत्यांसोबत शेअर करतो. बॉलीवूडचा हँडसम हंक हृतिक रोशन आजकाल त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनासाठी नेहमीच चर्चेत असतो. (Actor Hrithik Roshan pays Rs 20 lakh per month to his gym trainer)
अधिक वाचा-
–कानात झुमका अन् डोळ्यावर गॉगल; देखण्या अभिनेत्रीचा मनमोहक अंदाज पाहाच
–बॉलिवूड गाजवणारा अभिनेता ‘राजकुमार राव’ किंग खानमुळेच करू शकलाय पदार्पण; वाचा त्यांच्या प्रथम भेटीचा तो रंजक किस्सा