मुलगी वामिकासाठी अनुष्काने घेतला मोठा निर्णय, नक्की काय ठरवलंय तिने?


विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे दोघं नेटकऱ्यांसाठी नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहेत. काही महिन्यांपूर्वी या दोघांच्याही आयुष्यात एका परीचे आगमन झाले आणि विराट, अनुष्कासोबतच आता त्यांच्या मुलीच्याही चर्चा सोशल मीडियावर नेहमी होताना दिसतात. या दोघांनी जरी अजून त्यांच्या मुलीचा वामिकाचा चेहरा दाखवला नसला, तरीही ती आतापासूनच लाईमलाईटमध्ये आहे. अनुष्का बऱ्याचदा वामिकासोबत दिसते. मात्र, ती आपल्या मुलीचा चेहरा कुठेही दिसणार नाही याची काळजी घेतच असते.

सध्या अनुष्का चित्रपटांपासून दूर तिचे मदरहूड एन्जॉय करत आहे. २०१८ साली आलेल्या आनंद एल राय यांच्या ‘झिरो’ सिनेमात ती शेवटची झळकली. या सिनेमात ती शाहरुख खान आणि कॅटरिना कैफसोबत दिसली होती. त्यानंतर ती ना कोणत्या सिनेमात दिसली ना ही तिच्या कोणत्या चित्रपटाची घोषणा झाली. काही दिवसांपूर्वी अनुष्का लवकरच चित्रपटांमध्ये कमबॅक करू शकते अशा बातम्या येत होत्या. मात्र, आता अनुष्काने तिचा सिनेमांमधून घेतलेला ब्रेक २०२२ पर्यंत वाढवला आहे.

अनुष्का अजून काही महिने मुलगी वामिकासोबत घालवणार आहे. तिला या महामारीच्या परिस्थितीत घरातून शूटिंगसाठी बाहेर पडण्याची कोणतीही रिस्क घ्यायची नाहीये. माध्यमातील वृत्तानुसार, ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार असून या लाटेचा सर्वात जास्त आणि मोठा परिणाम लहान मुलांवर होणार आहे. त्यामुळे अनुष्का अजून काही महिने घरीच राहणार आहे. ती कोरोनाचे सर्व नियम पळत असून काळजी देखील घेत आहे. तिने तिच्या टीमला सांगितले आहे की, यावर्षी कोणतेही शूट प्लॅन करू नका.

अनुष्का या काळात तिच्या प्रॉडक्शन हाऊसवर लक्ष देत आहे. अनुष्काचे प्रोडक्शन हाऊस अतिशय उत्तम कलाकृती आणण्यासाठी प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध आहे. आगामी काळात अनुष्काच्या प्रॉडक्शनचे दोन प्रोजेक्ट प्रदर्शित होणार आहे. यात साक्षी तंवरची ‘माई,’ तर अन्विता दत्तची ‘काला’ आहे. कालामधून दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा अभिनयाच्या जगात पाऊल ठेवत आहे. यासोबतच ‘पाताल लोक २’ वरही अनुष्काचे प्रॉडक्शन हाऊस काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मला जबरदस्तीने प्रेग्नंट करू नका, होईल तेव्हा पेढे वाटेल’, प्रेग्नंसीच्या वृत्तांवर पूनम पांडेने सोडले मौन

-‘किंग खान’च्या लाडकीने केला जिममधील मिरर सेल्फी शेअर; दिसतेय एकदम ‘फिट एँड फाईन!’

-रशियाच्या रस्त्यांवर साडी नेसून फिरतेय तापसी पन्नू; सोशल मीडियावर रंगलीये चांगलीच चर्चा


Leave A Reply

Your email address will not be published.