अभिनेत्री नूतन तब्बल २० वर्षे त्यांच्या आईवर होत्या नाराज; जाणून घ्या का नव्हत्या बोलत दोघी

bollywood actress nutan did not talk to her mother for 20 years


सुप्रसिद्ध अभिनेत्री नूतन आजही चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहेत. आपल्या ४० वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. नूतन यांनी देव आनंद ते धर्मेंद्र, दिलीप कुमार ते संजीव कुमार आणि अमिताभ बच्चन या मोठमोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. एवढ्या दीर्घ कारकीर्दीत त्यांना ७ वेळा फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या व्यतिरिक्त भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊनही सन्मानित केले आहे. तरीही त्यांच्या जीवनात त्यांनी बरेच चढउतार पाहिले आहेत.

नूतन आपल्या चित्रपट कारकिर्दीत उंचीवर होत्या, परंतु वैयक्तिक आयुष्यात त्या खूप उदास होत्या. असे म्हटले जायचे की, त्यांची आई शोभना समर्थ यांच्याशी त्यांचे संबंध ठीक नव्हते. पैशाच्या हेराफेरीबाबत दोघींमध्ये वाद झाला आणि त्या दोघी पुढे २० वर्षे बोलल्या नाहीत.

खरं तर घडले असे की, एके दिवशी नूतन यांना आयकर कार्यालयाकडून, थकित कर भरण्यासाठी नोटीस मिळाले. त्यावेळी आई शोभना यांनी त्यांना कर भरण्यास सांगितले. तथापि, नूतन कंपनीत ३० टक्के भागधारक होत्या आणि आई त्यांना संपूर्ण कर भरण्यास सांगत होत्या. कर भरण्याची रक्कम खूप जास्त होती. नूतन आईला म्हणाल्या की, “मी माझ्या वाट्याइतका कर भरण्यास तयार आहे. तरीही माझे सर्व उत्पन्न कंपनीकडेच जाते. तू मला संपूर्ण कर भरायला सांगत आहेस, हे चुकीचे आहे.” यावरून दोघींमध्ये वाद झाला आणि त्या तब्बल २० वर्षे एकमेकींशी बोलल्या नाहीत.

नूतन यांनी नौदल अधिकारी रजनीश बहल यांच्याशी लग्न केले आणि जाहीर केले की, त्या आता चित्रपटांमध्ये काम करणार नाहीत. परंतु मुलगा मोहनीश बहलच्या जन्मानंतर त्यांना एकापेक्षा एक भूमिका मिळू लागल्या, यामुळे नूतन यांनी चित्रपटांकडे परत जाण्यास सुरुवात केली. १९५९ मध्ये आलेल्या ‘सुजाता’ या चित्रपटाने नूतनची कारकीर्द उंचीवर नेली. यात नूतनने रुपेरी पडद्यावर अस्पृश्य मुलीची व्यक्तिरेखा साकारली होती, जी चाहत्यांना आजही लक्षात आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-वैजयंती माला यांना नव्हते करायचे चित्रपटात काम, एका डान्स परफॉर्मन्सने बदलले आयुष्य

-प्रेमासाठी काहीही! प्रेम मिळवण्यासाठी ‘या’ कलाकारांनी चित्रपटात हद्दच केली पार, सुनील शेट्टीही यादीत सामील

-बॉलिवूडमधील ‘या’ प्रसिद्ध जोडप्यांना लग्नानंतर झाले नाही मूल, दिलीप कुमार अन् सायरा बानोचाही समावेश


Leave A Reply

Your email address will not be published.