फिटनेस फ्रिक शिल्पा शेट्टीच्या १ वर्षांच्या मुलीसह संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण, अभिनेत्रीचा रिपोर्ट निगेटिव्ह

Actress Shilpa Shetty's entire family, including Raj Kundra and their kids, test Covid-19 positive


कोरोना व्हायरसने प्रत्येक क्षेत्रात हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची आकडेवारी वाढताना दिसत आहे. अशातच आता बॉलिवूडमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. फिटनेस फ्रिक म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे संपूर्ण कुटुंब कोरोनाच्या तावडीत सापडले आहे. तिने काही वेळापूर्वीच सोशल मीडियावर सांगितले आहे की, मागील १० दिवस त्यांच्यासाठी खूपच कठीण होते.

सर्वप्रथम शिल्पाच्या सासू- सासऱ्यांना आणि त्यानंतर तिच्या दोन मुलांना कोरोनाची लागण झाली. तसेच तिच्या आईला आणि शेवटी पती राज कुंद्रालाही कोरोना झाला. संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली असली, तरीही शिल्पाचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला आहे.

शिल्पाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर लिहिले की, “मागील १० दिवस आमच्या कुटुंबासाठी खूपच कठीण होते. माझ्या सासू- सासऱ्यांना कोरोना झाला होता. त्यानंतर माझी मुलगी समीक्षा आणि मुलगा विवान, माझी आई आणि माझे पती राज यांनाही कोरोनाची लागण झाली. या सर्वांना आपापल्या खोलीत आयसोलेट (विलगीकरण) केले आहे आणि कोरोना नियमांचे संपूर्ण पालन केले जात आहे.”

यासोबतच शेवटी तिने नागरिकांना मास्क घालण्यास, घरातून बाहेर न पडण्यास आणि आपली काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. शिल्पा मागील वर्षी सरोगसीद्वारे आई बनली होती. तिची मुलगी समीक्षा १५ फेब्रुवारीला १ वर्षांची झाली आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.