धक्कादायक! अनेक सुपरहिट सिनेमे देणाऱ्या चित्रांगदावर कॉलेजमध्ये झाली होती रॅगींग

Chitrangada Singh reached to their modeling career through her college ragging


चित्रांगदा सिंग एकेवेळी आपल्या अभिनयाने आणि मॉडेलिंगने अनेक चाहत्यांच्या गळ्यातील ताईत झाली होती. तिच्या मॉडेलिंगने तर तिच्या चाहत्यांवर जादूच केली होती. आता हीच चित्रांगदा कमबॅक करतेय. ती लवकरच तिच्या ‘बॉब बिस्वास’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात अभिषेक बच्चन तिच्यासोबत मुख्य भूमिकेत असणार आहे. नुकताच चित्रांगदा सिंग हीचा एक इंटरव्ह्यू चाहत्यांना पाहायला मिळाला, त्यात तिने तिच्या कॉलेज लाईफबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत, त्यात तिने चित्रपटात सृष्टीत कसा प्रवेश केला याचा देखील खुलासा केला आहे.

चित्रांगदा सिंग हिने सांगितले की, कॉलेजमध्ये झालेल्या रॅगिंगनंतर कसे तिचे आयुष्य बदलले. ती म्हणाली,”माझ्या मॉडेलिंगची सुरूवात कॉलेजच्या पहिल्या वर्षापासून झाली. आम्हाला कॉलेजमध्ये उलटा सलवार कुर्ता घालून यायला लावले होते. केसांना खूप तेल लावले होते आणि बादलीत पुस्तक ठेवून आम्हाला रॅम्प वॉक करायला लावले होते. तसं बघायला गेलं तर हे माझं मॉडेलिंगचं पाहिलं ऑडिशन होत.जे मी खूप चांगल्या पद्धतीने केले होते आणि मी त्यानंतर कॉलेजच्या फॅशन टीमचा भाग झाले.”

चित्रांगदा सिंगने पुढे सांगितले की,” तेव्हा मला अनेक मुलींबद्दल माहिती मिळाली की ज्या आधीच मॉडेलिंग करतात. नंतर मी एक फोटोशूट केले, जे फोटो खूपच वेगाने व्हायरल झाले. त्यानंतर मला एका जाहिरातीसाठी ऑडिशनसाठी बोलवले होते परंतु मी त्यात रिजेक्ट झाले. त्या वेळेस गुलजार साहेबांनी माझं हे ऑडिशन पाहिले होते, आणि त्यांनी मला ‘सनसेट’ नावाच्या एका मुझ्यिक अल्बममध्ये काम करण्याची संधी दिली. त्यानंतर मला ‘हजारो ख्वाइशे ऐशी’ यामध्ये ऑडिशन देण्याची संधी मिळाली.

जेव्हा तिला विचारले गेले की, एखाद्या प्रोजेक्टमध्ये काम करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे तेव्हा तिने खुलासा केला की, “माझ्या मते दिग्दर्शक हा अत्यंत महत्त्वाचा आहे. कागदावरील प्रत्येक वाक्याला तो सत्यात उतरवण्याच्या प्रयत्न करत असतो.”

आवडत्या दिग्दर्शकाबद्दल विचारल्यावर तिने सांगितले की, ” मला ‘सुधीर मिश्रा’ यांच्यासोबत काम करायला खूप आवडतं. त्यांनी मला अनेक चांगली काम करण्याची संधी दिली आहे.”

हेही वाचा-

सौंदर्यात मधुबालाला उजवी; सुपरहिट चित्रपट देण्यात मास्टर तरीही मृत्यूनंतर तीन दिवस सडत होता या अभिनेत्रीचा मृतदेह

अशी अभिनेत्री होणे नाही! अडीच वर्षात २१ हिट सिनेमे; अठराव्या वर्षी लग्न तर एकोणिसाव्या वर्षी मृत्यू, तरीही आजही आहे स्मरणात

संजय दत्तने पत्नीला गिफ्ट केले चक्क १०० कोटींचे फ्लॅट; पण ती म्हणाली मला नकोय! वाचा कारण


Leave A Reply

Your email address will not be published.