दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग होणार अलिबागकर, खरेदी केले दोन मोठे बंगले आणि बागा


बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडपे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे दोघे त्याच्या चित्रपटामुळे नेहमीच चर्चेत असतात. अशातच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक घटनांमुळे देखील ते दोघे खूप चर्चेत येतात. अशातच त्यांच्याबाबत एक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे रणवीर आणि दीपिकाने आलिबागमध्ये एक लक्झरी हॉलिडे घर खरेदी केले आहे. या विकेंडला ते दोघेही अलिबागमध्ये होते आणि असे म्हटले जाते की, त्यांची डील फिक्स झाली आहे. माध्यमातील वृत्तानुसार, दीपिका आणि रणवीर त्यांच्या नव्या घराचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी अलिबागला रजिस्टर ऑफिसला गेले होते.

प्राप्त माहितीनुसार, रणवीर आणि दीपिकाने समुद्र किनारी एक मोठा प्लॉट खरेदी केला आहे. यामध्ये दोन मोठे बंगले आहेत. अलिबागमध्ये आधी देखील त्या दोघांना स्पॉट केले होते. शाहरुख खानचे अलिबागमध्ये फॉर्म हाऊस देखील आहे. या आधी दीपिकाने एक महागडे सर्व्हिस अपार्टमेंट खरेदी केले होते. दीपिकाने बंगळरूमध्ये एका मोठ्या बिल्डिंगमध्ये एक प्रॉपर्टी खरेदी केली आहे. सध्या रणवीर आणि दीपिका मुंबईमधील प्रभादेवी येथील एका शानदार ४ बीएचके अपार्टमेंटमध्ये राहतात. हे अपार्टमेंट तिने २०१० मध्ये खरेदी केले होते. लग्नानंतर ती रणवीरसोबत तिथे राहायला लागली. (Deepika Padukone and Ranveer Singh buy a luxurious property in Alibaug )

त्या दोघांच्या ही कामाबद्दल बोलायचे झाल्यास, दीपिका आणि रणवीर त्यांच्या आगामी ‘८३’ या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात रणवीर भारताचा पूर्ण क्रिकेट कॅप्टन कपिल देवच्या भूमिकेत दिसणार आहे. तर दीपिका त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. या सोबत रणवीर आता ‘सर्कस’, ‘जयेश भाई जोरदार’ आणि ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ या चित्रपटात दिसणार आहे. दीपिका पदुकोणबाबत बोलायचे झाल्यास, तो शाहरुख खानसोबत ‘पठाण’ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच ती ‘फायटर’ आणि ‘द इटर्न’ या चित्रपटात दिसणार आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनयासह आयुष्मानने गिरवलेत पत्रकारितेचेही धडे; तर ‘हे’ आहे अभिनेत्याचं खरं नाव

-रिलायन्स एन्टरटेन्मेंट अन् टी- सीरिजमध्ये मोठी भागीदारी; हजारो कोटींच्या गुंतवणुकीतून बनवणार ‘हे’ १० चित्रपट

-‘आली गवर आली, सोनपावली आली…’, मानसी नाईकने जल्लोषात केले गौराईचे स्वागत


Leave A Reply

Your email address will not be published.